Skip to content

Measures बद्दल बायबलमधील वचने

41 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे.

  2. त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर.

  3. (एक ओमेर हा एका एफाचा दहावा भाग आहे.)

  4. मेजाच्या सभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून त्यावर सोन्याचा काठ करावा.

  5. तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला असावा व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत असावा.

  6. पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस अर्पण करावे.

  7. “जर होले किंवा पारव्याची पिल्ले आणण्याइतकीही त्याची ऐपत नसेल, तर त्याने एफाचा दहावा भाग उत्तम पीठ आणावे. ते पापार्पण असल्यामुळे त्याने ते जैतुनाच्या तेलात मिश्रित करू नये किंवा त्यावर धूपही ठेवू नये.

  8. आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर तेल घेऊन यावे.

  9. मग याजकाने तेलाचा काही भाग घ्यावा आणि ते आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर ओतावे,

  10. “ ‘लांबी, वजन किंवा प्रमाण मापण्यात अप्रामाणिक मापे वापरू नका.

  11. (रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग हा शेवटचा होता. त्याचा पलंग लोखंडाने सजविला होता आणि तो चार हात लांब आणि दोन हात रुंद होता. तो अजूनही अम्मोनी लोकांच्या राब्बाहमध्ये आहे.)

  12. तुमच्या घरात दोन वेगवेगळी मापे वापरू नये—एक मोठे व एक लहान.

  13. तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

  14. तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.

  15. दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला. त्याने त्यांना जमिनीवर झोपविले आणि दोरीच्या अंतराने त्यांचे मोजमाप केले. जे दोन दोर्‍या भरले त्यांना मारून टाकले आणि जे एक दोरी भरले त्यांना जिवंत सोडले. याप्रकारे मोआबी लोक दावीदाच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.

  16. शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला आणि कबुतराची एक पावशेर विष्ठा पाच शेकेलला विकली गेली.

  17. त्यांना समक्षतेची भाकर टेबलावर ठेवणे, अन्नार्पणांसाठी लागणारे विशिष्ट सपीठ ठेवणे, बेखमीर पापड्या तयार करणे, भाजणे व मिश्रण तयार करणे व सर्व वजन आणि मापाचे प्रमाण बघणे या जबाबदाऱ्या होत्या.

  18. परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो ते कुठे आढळेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे.

  19. जेव्हा त्यांनी वार्‍याची गती स्थापित केली आणि जलांचे माप घेतले,

  20. याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या.

  21. पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे; माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे; प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा केवळ एक श्वास आहेत. सेला

  22. तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला; वाट्या भरून अश्रूंचे पेय त्यांना पाजले.

  23. वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे.

  24. दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल; एक होमेर बियाणे फक्त एक एफा धान्याचे पीक देईल.”

  25. म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो, त्याचे तोंड मोठे करून उघडतो. त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह, त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील.