मुख्य मजकुरावर जा

Marriage बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 83 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,”

  2. तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”

  3. यावरून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य म्हणाला, “असे असेल, तर मग मी ती सोडवू शकत नाही. कारण त्यामुळे माझी स्वतःची मालमत्ता धोक्यात येईल. तू स्वतःच ती सोडवून घे. मी हे करू शकत नाही.”

  4. (इस्राएलमध्ये पूर्वीच्या काळात, मालमत्तेची सोडवणूक करणे आणि तिचे हस्तांतरण पक्के होण्यासाठी, एका पक्षाने त्याची चप्पल काढून ती दुसऱ्याला देणे ही इस्राएलमधील व्यवहार कायदेशीर करण्याची पद्धत होती.)

  5. म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली.

  6. तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे.

  7. मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!”

  8. तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.

  9. एलअज़ारला पुत्र नव्हता: त्याला फक्त कन्याच होत्या. त्यांचे चुलतभाऊ कीशपुत्र यांनी त्यांच्याशी विवाह केले.

  10. या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.

  11. या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”

  12. म्हणून आपल्या कन्या या राष्ट्रांच्या पुरुषांना देऊ नयेत आणि त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांना करून घेऊ नयेत. त्या राष्ट्रांशी कोणत्याही प्रकारे मैत्रीचा समेट करू नये. तरच तुम्ही सुदृढ होऊन तुम्हाला त्या भूमीचे उत्तम फळ लाभेल व ती समृद्धी आमच्या मुलाबाळांस सदासर्वकाळचे वतन म्हणून लाभेल.’

  13. “आम्ही असेही वचन देतो की आम्ही आमच्या कन्यांना यहूदीतर पुरुषांशी व पुत्रांना यहूदीतर कन्यांशी विवाह करू देणार नाही.

  14. शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले.

  15. आता तुम्हीही तोच सर्व भयंकर दुष्टपणा करता व यहूदीतर स्त्रियांशी विवाह करून परमेश्वराशी विश्वासघात करीत आहात हे आम्ही ऐकावे काय?”

  16. तेव्हा त्याच्या तैनातीतील सेवकांनी त्याला सूचना केली, “एक सुंदर व तरुण कुमारिका राजासाठी शोधण्यात यावी.

  17. राजाने याकरिता कारभारी नेमले जेणेकरून प्रत्येक प्रांतातील सुंदर व तरुण कुमारिकांना शूशनच्या राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात यावे. त्यांना अंतःपुराचा प्रमुख खोजा हेगाइकडे सोपविण्यात यावे, जो त्यांच्यावर सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करेल.

  18. मग जी तरुणी तुम्हाला अधिक प्रसन्न करेल ती वश्तीच्या जागी राणी केली जाईल.” या सूचनेने राजा अतिशय संतुष्ट झाला आणि त्याने ती योजना अंमलात आणली.

  19. जेव्हा आता राजाची आज्ञा जाहीर करण्यात आली, तेव्हा अनेक तरुण कुमारिका शूशन राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात आल्या व हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आल्या. एस्तेरलाही राजवाड्यात आणून अंतःपुराचा अधिकारी हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आले.

  20. एस्तेरला पाहून अंतःपुराचा अधिकारी हेगाइची कृपादृष्टी तिच्यावर झाली; आणि लगेचच तिच्यासाठी त्याने सौंदर्यप्रसाधनांची व खास भोजनपदार्थांची व्यवस्था केली. राजवाड्यातील सात दासी तिच्या तैनातीला त्याने दिल्या व तिला त्यांच्यासह अंतःपुरातील सर्वात उत्तम दालनात हालविले.

  21. एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती कोणालाही सांगितली नाही, कारण मर्दखयाने तिला ते सांगू नये असे बजावले होते.

  22. एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे.

  23. अहश्वेरोश राजाच्या शयनमंदिरात नेण्यापुर्वी प्रत्येकीवर बारा महिने सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करण्यात येत, सहा महिने गंधरसाच्या तेलाचा उपचार व सहा महिने खास सुवासिक द्रव्ये व प्रसाधनांचा उपचार केला जाई.

  24. मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती.

  25. तिला संध्याकाळी नेण्यात येई आणि दुसर्‍या दिवशी सकाळी राजाच्या उपपत्नी राहत, त्या अंतःपुराच्या दुसर्‍या भागात ती जाई. तिथे ती राजाच्या खोजांपैकी शाशगज नावाच्या खोजाच्या देखरेखीखाली असे. राजाने तिचे नाव घेऊन तिला परत बोलाविले नाही, तर राजाकडे तिला पुन्हा पाठविले जात नसे.