मुख्य मजकुरावर जा

Marriage बद्दल बायबलमधील वचने: Often contracted, in their own tribe

8 वचने · 83 पैलू

Often contracted, in their own tribe बद्दल वचने

  1. सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा.

  2. इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे.

  3. इस्राएली लोकांतील कोणत्याही गोत्रातील ज्या प्रत्येक मुलीला वतन मिळाले असेल, तिने आपल्या पित्याच्या गोत्राच्या कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह करावा, यासाठी की प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे वतन मिळेल.

  4. कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.”

  5. याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले.

  6. सलाफहादच्या कन्या म्हणजे महलाह, तिरजाह, होगलाह, मिल्काह व नोआहने त्यांच्या पित्याच्या चुलत भावांशी विवाह केला.

  7. त्यांनी योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या गोत्राच्या कुळातच विवाह केला व त्यांचे वतन त्यांच्या पित्याच्या गोत्रात व कुळातच राहिले.

  8. मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.