Skip to content

Marriage बद्दल बायबलमधील वचने: With feasting

14 वचने · 83 पैलू

With feasting बद्दल वचने

  1. तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.

  2. आता त्याचे वडील त्या स्त्रीला बघायला खाली गेले. आणि तिथे शमशोनाने तरुणांच्या प्रथेप्रमाणे मेजवानी दिली.

  3. ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली.

  4. ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले.

  5. तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तिथे होती,

  6. येशू व त्यांच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते.

  7. ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.”

  8. येशू म्हणाले, “बाई, तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजूनही आलेली नाही.”

  9. त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.”

  10. त्या ठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लीटर पाणी मावत असे.

  11. येशू त्या नोकरांना म्हणाले, “रांजण पाण्याने भरा” त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपूर भरले.

  12. नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातील काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.” त्यांनी तसे केले,

  13. त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले,

  14. “प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.”