Skip to content

Lion बद्दल बायबलमधील वचने

27 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याच्या मागचा भाग गोलाकार होता. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह केलेले होते.

  2. प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते.

  3. त्याच्या वाटेने जात असताना, त्याला वाटेत एका सिंहाने गाठले व त्याला मारून टाकले आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडून राहिले असून, त्याच्या एका बाजूला सिंह व दुसर्‍या बाजूला गाढव उभे राहिले.

  4. जे लोक त्या रस्त्याने येणे जाणे करीत होते त्यांनी त्याच्या शरीराच्या बाजूला सिंह उभा आहे असे पाहिले आणि त्यांनी शहरात जाऊन ज्या ठिकाणी वृद्ध संदेष्टा राहत होता तिथे ही बातमी सांगितली.

  5. त्याला त्याच्या प्रवासातून माघारी आणलेल्या त्या संदेष्ट्याने त्याविषयी ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराचा मनुष्य, ज्याने याहवेहच्या वचनाचा अवमान केला तो हाच. याहवेहने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले व त्याने त्याला फाडून मारून टाकले, याहवेहने त्याला चेतवणी दिल्यानुसार ते घडले आहे.”

  6. तेव्हा त्या संदेष्ट्याने त्याच्या मुलांना म्हटले, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला,” त्यानुसार त्यांनी केले.

  7. तेव्हा तो गेला आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडलेले व त्याच्या बाजूला गाढव व सिंह उभे असलेले आढळले. सिंहाने ना त्याचे शरीर खाऊन टाकले होते ना त्या गाढवाला फाडले होते.

  8. जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले.

  9. अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.”

  10. “इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप कर

  11. आणि म्हण: “ ‘तुझी आई सिंहांमध्ये सिंहीण होती! ती त्यांच्यामध्ये वसत होती आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले.

  12. तिच्या पिल्लांपैकी एकाला तिने वाढवले, आणि तो एक बलवान सिंह झाला. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.

  13. तेव्हा राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला गेला. त्यांनी त्याला फासात अडकवून इजिप्त देशात नेले.

  14. “ ‘जेव्हा त्या सिंहिणीने आपल्या भग्न होत असलेल्या आशा पहिल्या, तिच्या अपेक्षा गेल्या, तिने तिच्या पिल्लांमधून अजून एक पिल्लू घेतले आणि त्याला बलवान सिंह बनविले.

  15. तो इतर सिंहांमध्ये फिरू लागला, कारण तो आता बलवान सिंह होता. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.

  16. त्याने त्यांचे किल्ले मोडले आणि त्यांची नगरे उद्ध्वस्त केली. तो देश व त्यातील राहणारे सर्वजण त्याच्या गर्जनेने भयभीत झाले.

  17. तेव्हा इतर राष्ट्र व सभोवतालचे प्रांत त्याच्याविरुद्ध आले, त्यांनी त्याच्यासाठी जाळे पसरले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला.

  18. त्यांनी त्याला आकड्याने ओढून पिंजर्‍यात टाकले आणि त्याला बाबेलच्या राजाकडे आणले. त्याने त्याला तुरुंगात ठेवले, म्हणून इस्राएलच्या पर्वतांवर त्याची गर्जना पुन्हा ऐकू आली नाही.

  19. तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”

  20. आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्‍यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये.

  21. मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती.

  22. राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला.

  23. जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”

  24. तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो!

  25. माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.”