मुख्य मजकुरावर जा

Ingratitude to God बद्दल बायबलमधील वचने

52 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय? (जरी ते सर्व देव नाहीतच.) परंतु माझ्या लोकांनी आपल्या गौरवी परमेश्वराची व्यर्थ मूर्तींशी अदलाबदल केली.

  2. हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा आणि भीतीने गर्भगळीत व्हा,” अशी याहवेह घोषणा करतात.

  3. “माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्‍याला, म्हणजे मला, सोडले आहे, आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.

  4. “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.

  5. हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत, प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीची लालसा धरतो.

  6. हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?

  7. “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत.

  8. इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी माझा घोर विश्वासघात केला आहे,” असे याहवेह म्हणतात.

  9. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  10. “मानवपुत्रा, यरुशलेमच्या अमंगळ कृत्यांबद्दल तिचा विरोध कर

  11. आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती.

  12. तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी नाळ कापली नव्हती, ना तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले होते व तुला ना मिठाने चोळले होते, ना कापडाने गुंडाळले होते.

  13. तुझ्याकडे कोणी दयेने पाहिले नाही किंवा तुझ्यासाठी यापैकी कोणतीही गोष्टी करावी म्हणून कोणाला सहानुभूती आली नाही. तर तुला मोकळ्या मैदानात टाकून दिले होते, तुझ्या जन्माच्या दिवशीच तू तुच्छ मानली गेली होती.

  14. “ ‘तेव्हा मी तिथून जाताना तुला तुझ्या रक्तात लोळताना पाहिले आणि तू तिथे तुझ्या रक्तात पडलेली असताना मी तुला म्हटले, “जिवंत राहा!”

  15. शेतातील रोपट्याप्रमाणे मी तुला वाढवले. तू वाढून मोठी होऊन वयात आलीस. तुझे स्तन विकसित झाले आणि तुझे केस वाढले, तरीही तू नग्नच होतीस.

  16. “ ‘नंतर मी तिथून गेलो आणि जेव्हा मी तुला पाहिले आणि मला दिसले की तू प्रीती करण्याच्या वयात आली होतीस, तेव्हा मी आपल्या वस्त्राचा कोपरा तुझ्यावर पसरून तुझे नग्न शरीर झाकले. तुला मी आपली पवित्र शपथ देऊन तुझ्याशी करार केला आणि तू माझी झालीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  17. “ ‘पाण्याने तुला स्नान करवून तुझ्यावरील रक्त मी धुऊन टाकले आणि तुला तेल लावले.

  18. तुला मी नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली आणि उत्तम चामड्याची पायतणे चढविली. तुझ्यावर मी उत्तम रेशमी कपडे व भरजरी वस्त्रे पांघरली.

  19. मी तुला दागिन्यांनी सजविले: मी तुझ्या हातांवर बांगड्या व गळ्यात साखळी घातली,

  20. आणि मी तुझ्या नाकात नथ, कानात कुंडली आणि तुझ्या डोक्यावर एक सुंदर मुकुट घातला.

  21. याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस.

  22. तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती अनेक देशांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या वैभवाने तुझे सौंदर्य परिपूर्ण झाले होते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  23. “ ‘परंतु तू आपल्याच सौंदर्यावर भरवसा केला आणि वेश्या होण्यास आपल्या सौंदर्याचा उपयोग केला. जे कोणी तुझ्या वाटेने गेले त्यांना तुझ्या सौंदर्याने तू भुरळ घातली आणि तुझे सौंदर्य त्याचे झाले.

  24. “महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते.

  25. कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत.