Skip to content

Epistles बद्दल बायबलमधील वचने

38 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले.

  2. या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्‍यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत.

  3. सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे.

  4. यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.

  5. त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता: प्रेषित, वडीलजन आणि बंधुवर्ग यांच्याकडून, अंत्युखिया, सिरिया व किलिकिया येथील गैरयहूदी विश्वासणार्‍यांना: सलाम.

  6. आमच्यामधून काहीजण आमच्या परवानगीशिवाय तिथे येऊन तुम्हाला गोंधळात पाडत आहेत आणि त्यांच्या बोलण्याने तुमची मने विचलित करीत आहेत असे आमच्या ऐकण्यात आले आहे.

  7. तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे.

  8. या लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आपले जीव धोक्यात घातले होते.

  9. यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील.

  10. पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत:

  11. मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. निरोप द्यावा.

  12. मंडळीचा वडील याजकडून,

  13. कारण जे सत्य आमच्यामध्ये राहते आणि तेच आमच्याबरोबर कायम राहील.

  14. परमेश्वर जे पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील.

  15. पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला.

  16. आता, हे प्रिय स्त्रिये, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु तीच जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.

  17. प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे.

  18. मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळजण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे.

  19. आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा.

  20. जे कोणी सर्वांच्या पुढे जात राहतात आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाहीत त्यांच्याकडे परमेश्वर नाही; जो कोणी या शिक्षणात राहतो त्यांच्याकडे पिता आणि पुत्र दोघेही आहेत.

  21. जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका.

  22. तुम्ही जर त्यांचे स्वागत केले, तर तुम्ही त्यांच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हाल.

  23. तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते कागद आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. त्याऐवजी तुमची भेट घ्यावी आणि समोरासमोर तुमच्याबरोबर बोलावे अशी आशा करतो म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.

  24. जिला परमेश्वराने निवडले आहे, त्या तुझ्या बहिणीची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात.

  25. मंडळीचा वडील याजकडून,