Skip to content

Drunkenness बद्दल बायबलमधील वचने

52 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका! तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे.

  2. तुमचे सार्वभौम याहवेह, तुमचे परमेश्वर, जे त्यांच्या लोकांना सुरक्षित ठेवतात, ते असे म्हणतात: “पाहा, जो प्याला तुम्हाला धुंद करून अडखळवितो तो मी तुमच्या हातातून काढून घेतला आहे; त्या प्याल्यातून, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून तुम्ही यापुढे कधीही पिणार नाही.

  3. तुमचा छळ करणाऱ्यांच्या हातात मी तो देईन, जे तुम्हाला म्हणाले, ‘भूमीवर पडा, म्हणजे आम्ही तुमच्यावरून चालत जाऊ.’ आणि तुम्ही तुमची पाठ जमिनीसारखी केली, जणू रस्ताच, ज्यावरून चालत जावे.”

  4. याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव.

  5. जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.”

  6. “त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’

  7. हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल!

  8. बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.

  9. बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. तिच्यासाठी विलाप करा! तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; कदाचित ती बरी होऊ शकेल.

  10. “ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. पण ती बरी होऊ शकत नाही. आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’

  11. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन.

  12. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील, जो पेला मोठा व खोल आहे; तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल, कारण त्यात पुष्कळ मावते.

  13. नशा व दुःख यांनी तू भरशील हा पेला नाश व विध्वंसाचा आहे, तो पेला तुझी बहीण शोमरोन हिचा आहे.

  14. तू तो पेला पिऊन कोरडा करशील आणि त्याचे तुकडे चावशील; आणि तू आपली छाती फाडशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  15. बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्‍यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला.

  16. बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील.

  17. म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली.

  18. द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले.

  19. “धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो, ते मद्यधुंद होईपर्यंत थेट पखालीतून ओतून पाजतो, म्हणजे तो त्यांची विवस्त्र शरीरे पाहू शकेल!

  20. तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या! याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल.

  21. लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल, आणि तुम्ही केलेला प्राण्यांचा नाश तुम्हाला भयभीत करेल, कारण तुम्ही मनुष्याचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला आहे.

  22. आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.

  23. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.

  24. त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.

  25. देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा,