Skip to content

Drunkenness बद्दल बायबलमधील वचने: Figurative

16 वचने · 31 पैलू

Figurative बद्दल वचने

  1. म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका! तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे.

  2. तुमचे सार्वभौम याहवेह, तुमचे परमेश्वर, जे त्यांच्या लोकांना सुरक्षित ठेवतात, ते असे म्हणतात: “पाहा, जो प्याला तुम्हाला धुंद करून अडखळवितो तो मी तुमच्या हातातून काढून घेतला आहे; त्या प्याल्यातून, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून तुम्ही यापुढे कधीही पिणार नाही.

  3. तुमचा छळ करणाऱ्यांच्या हातात मी तो देईन, जे तुम्हाला म्हणाले, ‘भूमीवर पडा, म्हणजे आम्ही तुमच्यावरून चालत जाऊ.’ आणि तुम्ही तुमची पाठ जमिनीसारखी केली, जणू रस्ताच, ज्यावरून चालत जावे.”

  4. याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव.

  5. जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.”

  6. “त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’

  7. हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल!

  8. बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.

  9. बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. तिच्यासाठी विलाप करा! तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; कदाचित ती बरी होऊ शकेल.

  10. “ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. पण ती बरी होऊ शकत नाही. आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’

  11. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन.

  12. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील, जो पेला मोठा व खोल आहे; तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल, कारण त्यात पुष्कळ मावते.

  13. नशा व दुःख यांनी तू भरशील हा पेला नाश व विध्वंसाचा आहे, तो पेला तुझी बहीण शोमरोन हिचा आहे.

  14. तू तो पेला पिऊन कोरडा करशील आणि त्याचे तुकडे चावशील; आणि तू आपली छाती फाडशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  15. “धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो, ते मद्यधुंद होईपर्यंत थेट पखालीतून ओतून पाजतो, म्हणजे तो त्यांची विवस्त्र शरीरे पाहू शकेल!

  16. तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या! याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल.