Skip to content

Divorce बद्दल बायबलमधील वचने: General references

61 वचने · 22 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “एखाद्या मनुष्याने आपली मुलगी गुलाम म्हणून विकली, तर पुरुष केले जातात त्याप्रमाणे ती स्वतंत्र केली जाणार नाही.

  2. ज्याने तिला आपल्यासाठी निवडून घेतले होते, त्या आपल्या मालकाला जर ती संतुष्ट करीत नाही, तर त्याने तिची खंडणी भरून तिला जाऊ द्यावे; तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही, कारण त्याने तिचा विश्वास तोडला आहे.

  3. पण आपल्या मुलासाठी जर तो तिची निवड करतो, तर त्याने आपल्या मुलीचे हक्क तिला द्यावे.

  4. जर तो दुसर्‍या स्त्रीशी विवाह करतो, तर त्याने पहिल्या पत्नीला अन्न, वस्त्र, आणि वैवाहिक हक्क यापासून वंचित ठेऊ नये.

  5. जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते.

  6. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांना तुम्ही बंदिवान कराल,

  7. आणि त्या बंदिवानात तुम्हाला जर एखादी देखणी तरुणी आढळली आणि तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालात तर तिचा तुम्ही तुमची पत्नी म्हणून स्वीकार करावा.

  8. तिला तुम्ही तुमच्या घरी न्यावे आणि तिच्या डोक्यावरील केसांचे मुंडण करावे, तिची नखे कापावीत

  9. आणि तिने बंदिवासाची सर्व वस्त्रे बाजूला ठेवून द्यावीत आणि नंतर तिने तुमच्या घरी तिच्या आईवडिलांसाठी संपूर्ण महिनाभर शोक करावा. त्यानंतर तुम्ही तिच्याशी संबंध ठेऊ शकता, तुम्ही तिचे पती व ती तुमची पत्नी होईल.

  10. जर तुम्हाला ती आवडेनाशी झाली, तर तिला मुक्त करावे व तिला हवे तिथे जाऊ द्यावे, तुम्ही तिला किंमत घेऊन विकू नये, अथवा तिला गुलामासारखे वागवू नये कारण तुम्ही तिची अवहेलना केली आहे.

  11. कोणा पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत विवाह केला, परंतु नंतर तो तिच्यासोबत संतुष्ट होत नाही आणि त्याला तिच्यात काही दोष आढळला, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला आपल्या घरातून घालवून द्यावे,

  12. आणि त्याचे घर सोडल्यानंतर ती दुसर्‍या पुरुषाची पत्नी होते,

  13. आणि तिच्या दुसर्‍या पतीलाही ती आवडली नाही व त्यानेही तिच्या हाती सूटपत्रे देऊन तिला घालवून दिले किंवा तो मरण पावला,

  14. तर तिच्या पहिल्या पतीने तिला पत्नी म्हणून पुन्हा स्वीकारू नये, कारण ती भ्रष्ट झालेली आहे. अशा स्त्रीशी विवाह करणे ही गोष्ट याहवेहच्या दृष्टीने अमंगळ अशी आहे. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या देशावर पाप आणू नका.

  15. परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.

  16. मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे.

  17. आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे.

  18. तर आता ऊठ; या सर्वगोष्टी तुझ्या हातात आहेत. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, म्हणून धैर्य धर व योग्य ते कर.”

  19. तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्‍यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली.

  20. मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.

  21. मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे.

  22. इस्राएलांच्या पुढार्‍यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल.

  23. तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.

  24. मग एज्रा याजक उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे, कारण तुम्ही गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले आहेत आणि आपण इस्राएलचे पातक आणखीच वाढविले आहे.

  25. आता याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराचा गौरव करा येथून पुढे त्यांच्याच इच्छेप्रमाणे करा. स्वतःला सभोवतालच्या लोकांपासून आणि या गैरयहूदी स्त्रियांपासून वेगळे करा.”