Skip to content

Dedication बद्दल बायबलमधील वचने

213 वचने · 28 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘तथापि, कोणीही प्राण्याचे प्रथम जन्मलेले समर्पित करू शकत नाही, कारण प्रथम जन्मलेले मुळातच याहवेहचे आहेत; बैल असो वा मेंढरे, ते याहवेहचेच आहे.

  2. जर ते अशुद्ध पशूंपैकी असेल, तर त्याची ठरवून दिलेले मूल्य द्यावे व त्या शिवाय ठरविलेल्या किमतीचा पाचवा भाग अधिक किंमत भरावी. जर तो पशू सोडवून घेतला जात नसेल, तर तो त्याच्या ठरविलेल्या किमतीत विकता येईल.

  3. “ ‘एखादा मनुष्य आपल्याजवळ असलेले काहीही याहवेहला समर्पित करेल—मग ते एखादी व्यक्ती असो, पशू असो वा वतनाची जमीन असो—ते विकू नये किंवा खंडणी भरून सोडवूनही घेऊ नये; कारण समर्पित ते सर्व याहवेहसाठी परमपवित्र आहे.

  4. “ ‘मरणदंडाची शिक्षा झालेल्या मनुष्याला खंडणी भरून सोडविता येणार नाही. त्याचा अवश्य वध करावा.

  5. “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत.

  6. ज्या कोणाला त्यांचा कोणताही दशांश भाग सोडावयाचा असेल त्यांनी त्या वस्तूंच्या किमतीचा पाचवा भाग अधिक रक्कम भरावी.

  7. गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल.

  8. कोणीही वाईटामधून चांगल्याची निवड करू नये किंवा अदलाबदल करू नये; तशी अदलाबदल केल्यास दोन्हीही प्राणी आणि बदली केलेला पवित्र होतील आणि त्यांना खंडणी भरून सोडवू शकणार नाहीत.’ ”

  9. या आज्ञा सीनाय पर्वतावर याहवेहने इस्राएली लोकांसाठी मोशेला दिल्या.

  10. जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.

  11. मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली.

  12. त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.

  13. याहवेहने मोशेला म्हटले,

  14. “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.”

  15. तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.

  16. गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.

  17. आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.

  18. कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.

  19. जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.

  20. कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”

  21. पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.

  22. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  23. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.

  24. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा;

  25. पापार्पणासाठी एक बोकड;