Skip to content

Decalogue बद्दल बायबलमधील वचने

54 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.

  2. याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.

  3. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळावा.

  4. सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी,

  5. परंतु सातवा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वराचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे बैल, गाढव, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी, तुमचा दास आणि दासी यांनी देखील तुमच्यासह त्या दिवशी विश्रांती घ्यावी.

  6. तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.

  7. याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.

  8. तुम्ही खून करू नका.

  9. तुम्ही व्यभिचार करू नका.

  10. तुम्ही चोरी करू नका.

  11. तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.

  12. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका. त्याच्या घराचा किंवा भूमीचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा किंवा शेजार्‍याच्या मालकीच्या कशाचाही लोभ करू नका.”

  13. याहवेहने या आज्ञा तुमच्यातील प्रत्येकाला अग्नी, मेघ व निबिड अंधकार यांनी वेष्टिलेल्या पर्वतावरून उंच आवाजात उच्चारून दिल्या; व त्यात अधिक काहीही जोडले नाही. त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याजवळ दिल्या.

  14. “कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले. येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको,

  15. तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’ आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ ”

  16. येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले.

  17. कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला:

  18. “गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?”

  19. येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’

  20. हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे.

  21. यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’

  22. सर्व नियम आणि संदेष्ट्यांची शिकवण या दोन आज्ञांवरच आधारित आहे.”

  23. एका प्रसंगी एक नियमशास्त्र तज्ञ येशूंची परीक्षा पाहावी म्हणून आला, “गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्याकरिता मी काय करावे?”

  24. येशू म्हणाले, “याबाबत नियमशास्त्र काय म्हणते? तू काय वाचतोस?”

  25. त्याने उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचा परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने’ आणि ‘तुमच्या पूर्णशक्तीने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’”