- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Cloud बद्दल बायबलमधील वचने: Pillar of
Pillar of बद्दल वचने
दिवस व रात्र ते प्रवास करू शकतील, म्हणून दिवसा मेघस्तंभातून त्यांचे मार्गदर्शन करीत व रात्री अग्निस्तंभातून प्रकाश देत याहवेह त्यांच्या पुढे चालले.
दिवसाचा मेघस्तंभ व रात्रीचा अग्निस्तंभ यांनी लोकांसमोरून आपले स्थान सोडले नाही.
आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.
इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्या अग्नीप्रमाणे दिसले.
मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.
आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे.
जेव्हा लोक मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी थांबलेला पाहत, ते सर्व आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून उपासना करीत असत.
इस्राएली लोकांच्या सर्व प्रवासात, जेव्हा निवासमंडपावरून मेघ वर जाई तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत;
पण मेघ वर गेला नाही, तर तो वर जाईल त्या दिवसापर्यंत ते पुढे जात नसत.
त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले.
ज्या दिवशी निवासमंडप, कराराच्या नियमाचा मंडप उभारण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याला झाकून टाकले. संध्याकाळपासून सकाळपर्यंत निवासमंडपावरील मेघ अग्नीसारखे दिसू लागले.
आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले.
जेव्हा मंडपावरून मेघ वर जाई, तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; आणि जेव्हा मेघ थांबत असे, तिथे इस्राएली लोक तळ देत असत.
याहवेहच्या आज्ञेनुसार इस्राएली लोक प्रवासास निघत असत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत. जोपर्यंत निवासमंडपावर मेघ थांबत असे तोपर्यंत ते तळ देऊन राहत असत.
जेव्हा मेघ दीर्घकाळ निवासमंडपावर थांबून राहिला, तेव्हा इस्राएली लोक याहवेहची आज्ञा पाळीत व पुढे जात नसत.
कधीकधी मेघ काहीच दिवस निवासमंडपावर थांबत असे, तेव्हा याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देऊन राहत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात.
कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी जेव्हा तो वरती घेतला जाई, लोक पुढे जात. तो दिवस असो किंवा रात्र, जेव्हा मेघ वरती घेतला जात असे, ते पुढे निघत असत.
निवासमंडपावर मेघ दोन दिवस थांबून राहो किंवा एक महिना किंवा एक वर्ष राहो, इस्राएली लोक आपल्या छावणीत राहत आणि पुढे जात नसत; परंतु जेव्हा मेघ वर घेतला जाई, ते पुढे जात.
याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले.
दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला.
तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी प्रवास करीत राहिले.
मग ते याहवेहचे पर्वत म्हणजेच सीनाय पर्वतापासून निघाले व तीन दिवसांचा प्रवास करीत गेले. याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्याचे ठिकाण पाहण्यासाठी त्या तीन दिवसांचा प्रवास करीत त्यांच्यापुढे गेला.
ते छावणीतून निघाले तेव्हा दिवसा याहवेहचा मेघ त्यांच्यावर होता.
जेव्हा कोश पुढे जात असे तेव्हा मोशे म्हणे, “हे याहवेह, सक्रिय व्हा! तुमच्या शत्रूंची पांगापांग होवो; तुमचे वैरी तुमच्यापुढून पळून जावोत.”
जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे, “हे याहवेह, परत या, इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.”