मुख्य मजकुरावर जा

Civil Officer बद्दल बायबलमधील वचने: Appointed by kings

28 वचने · 2 पैलू

Appointed by kings बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता.

  2. अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता;

  3. यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार होते.

  4. योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता;

  5. अदोनिराम वेठबिगारी करणार्‍यांचा अधिकारी होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता;

  6. शेवा सचिव होता; सादोक व अबीयाथार याजक होते;

  7. आणि याईरचा वंशज ईरा दावीदाचा याजक होता.

  8. शलोमोन राजाने सर्व इस्राएलवर राज्य केले.

  9. हे सर्व मुख्य अधिकारी होते: सादोकाचा पुत्र अजर्‍याह याजक;

  10. शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा;

  11. यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, मुख्य सेनापती होता; सादोक व अबीयाथार, हे याजक होते.

  12. नाथानचा पुत्र अजर्‍याह, हा राज्याधिकार्‍यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता;

  13. अहीशार, राजवाड्या संबंधीच्या कामकाजाचा व्यवस्थापक होता. अब्दाचा पुत्र अदोनिराम हा मजुरांवर अधिकारी होता.

  14. शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.

  15. त्यांची नावे ही होती: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर होता;

  16. बेन-देकेर हा माकाज, शालब्बीम, बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर होता.

  17. बेन-हेसेद हा अरुब्बोथवर होता (सोकोह आणि हेफेरचा सर्व प्रदेश त्याच्याकडे होता);

  18. बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता);

  19. अहीलुदचा पुत्र बाअनाकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश;

  20. बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती);

  21. इद्दोचा पुत्र अहीनादाबकडे महनाईम.

  22. अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);

  23. हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर;

  24. पारुआहचा पुत्र यहोशाफाट हा इस्साखारमध्ये होता;

  25. एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर.