Chariot बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती.
राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.
शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असत.
त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते पाठवित असत.
आता अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”
रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा खचितच इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण जेव्हा यहोशाफाट मोठ्याने रडला,
आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.
ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला.
अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्याला पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.
याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला.
बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले.
ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत सनोवरचे भाले परजलेले आहेत.
रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत, चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत. ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत; ते वीजगतीने दौडत आहेत.
मग मी पुन्हा वर पाहिले, तो दोन पर्वतांमधून चार रथ येत असलेले मला दिसले. ते पर्वत कास्याचे होते.
पहिला रथ तांबडे घोडे ओढीत होते, दुसरा रथ काळे घोडे ओढीत होते,
तिसरा रथ पांढरे घोडे, तर चौथा रथ पंचरंगी घोडे ओढीत होते.
तेव्हा मी जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला विचारले, “प्रभू, हे काय आहेत?”
देवदूताने मला उत्तर दिले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या समोर उभे राहणारे हे चार स्वर्गीय आत्मे आहेत, ते तिथून बाहेर जात आहेत.
काळ्या घोड्यांचा रथ उत्तरेला जाईल आणि पांढर्या घोड्यांचा रथ पश्चिमेकडे, पंचरंगी घोड्यांचा रथ दक्षिणेकडे जाईल.”
जेव्हा ते शक्तिशाली घोडे निघाले, ते संपूर्ण पृथ्वीवर जाण्यास आतुर झाले होते आणि तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण पृथ्वीवर जा!” तेव्हा ते संपूर्ण पृथ्वीवर गेले.
मग त्याने मला बोलाविले आणि तो मला म्हणाला, “जे उत्तरेला गेले, त्यांनी उत्तरेकडील भूमीला माझ्या आत्म्याची शांती दिली आहे.”