Skip to content

Blasphemy बद्दल बायबलमधील वचने

90 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्‍या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल.

  2. सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्‍या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ”

  3. याहवेह म्हणतात, “तुम्ही माझ्याविरुद्ध उर्मटपणे बोलता.” “तरी तुम्ही विचारता, ‘तुमच्याविरुद्ध आम्ही काय बोललो?’

  4. “तुम्ही असे म्हणाला, ‘परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. त्यांचे सर्व विधिनियम पाळण्याने किंवा सर्वसमर्थ याहवेहपुढे शोक करण्याऱ्यासारखे जाण्याने आम्हाला काय मिळते?

  5. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही.

  6. जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्‍या युगात कधीही क्षमा होणार नाही.

  7. परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”

  8. असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते.

  9. कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे,

  10. बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा

  11. या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”

  12. सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील.

  13. ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”

  14. त्या पशूला गर्विष्ठ उद्गार काढणारे, दुर्भाषणे करणारे तोंड देण्यात आले होते. तसेच बेचाळीस महिने आपला अधिकार गाजविण्याचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आले होते.

  15. तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्‍या सर्वांची निंदा करीत राहिला.