Skip to content

Blasphemy बद्दल बायबलमधील वचने

90 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एकदा एका इस्राएली स्त्रीचा मुलगा, ज्याचे वडील इजिप्तचे होते, इस्राएली छावणीत गेला. तिथे छावणीत त्याचे आणि एका इस्राएली मनुष्याचे भांडण झाले.

  2. इस्राएली स्त्रीच्या मुलाने परमेश्वराच्या नावाची निंदा केली आणि तो शिव्याशाप देऊ लागला; तेव्हा त्याला मोशेकडे आणले. (त्याच्या आईचे नाव शेलोमीथ होते, ती दान वंशातील दिब्रीची कन्या होती.)

  3. तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

  4. मग याहवेहनी मोशेला सांगितले:

  5. “परमेश्वराच्या नावाची निंदा करणार्‍याला छावणीच्या बाहेर घेऊन जा. ज्यांनी हे बोलताना ऐकले आहे, त्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा.

  6. इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी;

  7. याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे.

  8. मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही.

  9. वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.

  10. ते मला श्वास घेऊ देत नाहीत, परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात.

  11. कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा, म्हणजे त्यांचा धाक मला अजून भयभीत करणार नाही.

  12. मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन, पण या घटकेला, मी ते करू शकत नाही.

  13. मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.

  14. माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का, दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता, आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता?

  15. तुम्हाला मानवी डोळे आहेत का? मनुष्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का?

  16. तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का, किंवा त्या बलवान मनुष्यासारखे तुमचे आयुष्य आहे,

  17. म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत आणि माझी पापे बारकाईने तपासून पाहावी;

  18. मी दोषी नाही हे जरी तुम्हाला माहीत आहे आणि मला तुमच्या हातून सोडविणारा कोणी नाही?

  19. परमेश्वराच्या वतीने तुम्ही दुष्टतेने बोलणार का? त्यांच्याकरिता तुम्ही कपटाचे भाषण कराल का?

  20. तुम्ही त्यांना पक्षपात दाखविणार का? परमेश्वराच्या वतीने त्यांचा वाद तुम्ही कराल काय?

  21. त्यांनी जर तुमची परीक्षा केली तर चांगले होईल काय? जसे मनुष्याला तसे तुम्ही परमेश्वरालाही फसवू शकाल काय?

  22. वार्‍याने उडून जाणार्‍या पानाला तुम्ही छळणार का? कोरड्या भुशाचा तुम्ही पाठलाग करणार का?

  23. कारण माझ्याविरुद्ध तुम्ही कटुत्वाच्या गोष्टी लिहिता, आणि माझ्या तारुण्यातील पातकांची शिक्षा मला देता.

  24. तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता; माझ्या पायांच्या तळव्यांना चिन्ह करून माझ्या सर्व मार्गावर तुम्ही लक्ष ठेवले आहे.

  25. कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,