- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Babylon बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्या दिवशी याहवेह तुम्हाला तुमच्या सर्व पीडा व अस्वस्थता व कठोर परिश्रमातून मुक्तता देतील.
तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल: पाहा, तो जुलूमशहा कसा नाश पावला आहे! त्यांचा उन्मत्तपणा कसा नष्ट झाला आहे!
कारण याहवेहने दुष्टांची काठी, व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे,
ज्या लोकांना तू क्रोधाने मारले, सतत ठोसा मारत राहिलास, बेफाम त्वेषाने व पाषाणहृदयी आवेशाने देशांना अधीन केले.
सर्व देश आता समाधानी आणि शांत आहेत; ते गाणी गात आहेत.
लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात, “आता तुम्हाला खाली पाडले आहे, तेव्हापासून आम्हाला तोडण्यासाठी कोणी आलेले नाही.”
अधोलोक तुम्हाला भेटण्यासाठी मृतांच्या रसातळात हालचाल होत आहे; मेलेल्यांचे आत्मे जागृत होऊन तुम्हाला अभिवादन करण्यासाठी— जगामध्ये जे सर्व पुढारी होते; जे सर्व राष्ट्रांवरील राजे होते, ते त्यांच्या सिंहासनावरून उठत आहेत.
ते सर्व प्रतिसाद देतील, ते तुम्हाला असे म्हणतील, “जसे आम्ही आहोत, तसे तुम्ही सुद्धा दुर्बल झाला आहात; तुम्ही आमच्यासारखे झाला आहात.”
तुमच्या वीणांच्या आवाजासहीत, तुमचा सर्व डामडौल खाली थडग्यात आणण्यात आला आहे, कृमी तुमच्या खाली पसरलेल्या आहेत आणि कीटक तुम्हाला झाकून टाकत आहेत.
पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!
तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला, “मी स्वर्गात चढून जाईन; मी माझे सिंहासन परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन; मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, झाफोनच्या सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन.
मी ढगांच्या शिखरांवर जाईन; मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन.”
परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात, खोल खाईत लोटला गेला आहेस.
जे तुझ्याकडे पाहतात ते टक लावून बघत आहेत, ते तुझ्या नशिबाविषयी विचार करतात: “हा तोच मनुष्य आहे काय, ज्याने पृथ्वीला हादरविले होते आणि राज्यांना कंप सुटेल असे केले होते.
ज्या मनुष्याने जगाला अरण्य केले ज्याने शहरे उद्ध्वस्त केली आणि तो त्याच्या बंदिवानांना घरी जाऊ देत नसे?”
राष्ट्रांचे सर्व राजे चिरनिद्रीत अवस्थेत आहेत, प्रत्येकजण स्वतःच्या कबरेत आहे.
परंतु तुला तुझ्या कबरेतून नको असलेल्या फांदीसारखे बाहेर टाकले आहे; ज्यांना तलवारीने भोसकून टाकले, जे दगडांच्या खड्ड्यात टाकण्यात येतात, ज्याप्रकारे माणसांची प्रेते पायाखाली तुडविली जातात तसे त्यांना तुमच्यावर झाकून टाकले आहे.
तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे. दुष्ट लोकांच्या संततीचा पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये.
भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये, म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा.
सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “मी त्यांच्याविरुद्ध उठेन, बाबेलचे नाव आणि तेथील जिवंत राहिलेले, तिची संतती आणि तिच्या वंशजांना मी नामशेष करून टाकेन,” असे याहवेह घोषित करतात.
समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, दहशती भूमीमधून येतो.
एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे: देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो. हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला! तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन.
यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.
माझे अंतःकरण अडखळते, भीती मला थरथर कापविते; ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे.
ते मेजावर भोजनाची तयारी करतात, ते गालिचे पसरवितात, ते खातात, ते पितात! अहो, अधिकारी, तुम्ही आता उठा, ढालींना तेल लावा!