Astronomy बद्दल बायबलमधील वचने: Sidereal phenomena
Sidereal phenomena बद्दल वचने
ज्या दिवशी याहवेहने अमोरी लोकांना इस्राएली लोकांच्या हाती दिले, तेव्हा इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआ याहवेहना म्हणाला: “सूर्या, गिबोनावर स्थिर उभा हो, आणि हे चंद्रा, तू अय्यालोनच्या खोर्यावर स्तब्ध राहा”
तेव्हा इस्राएली राष्ट्राने आपल्या शत्रूंचा सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर उभा राहिला, आणि चंद्र स्तब्ध झाला. जसे याशारच्या ग्रंथात लिहिलेले आहे. सूर्य संपूर्ण दिवसभर आकाशात मध्यभागी स्थिर राहिला आणि त्याने अस्त होण्यास विलंब केला.
असा दिवस यापूर्वी कधीही आला नव्हता आणि त्यानंतरही कधी आला नाही. त्या दिवशी, याहवेहने एका मनुष्याचा शब्द ऐकला. कारण याहवेह निश्चितच इस्राएलसाठी लढत होते!
ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात.
ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; ते तार्यांचा प्रकाश मुद्रित करतात.
तेच एकटे आकाश ताणून पसरवितात आणि समुद्राच्या लाटांवरून चालतात.
सप्तर्षी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत.
जेव्हा मी तुझा नाश करेन, मी आकाशे झाकीन आणि त्यातील तारे अंधुक करेन; सूर्याला मी ढगांनी आच्छादेन आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही.
आकाशातील प्रत्येक चमकणारी ज्योत मी तुझ्यावर अंधार अशी करेन; मी तुझ्या देशावर अंधकार आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
“हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात, “ ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;
आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’
आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.
सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.
वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.
प्रभूचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला.
अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले.
एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले.
मग तिसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला.
त्या तार्याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.
चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.
मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले.
तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले.
मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते.
त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला.