Skip to content

Astronomy बद्दल बायबलमधील वचने: General references

17 वचने · 2 पैलू

General references बद्दल वचने

  1. “कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय?

  2. तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय?

  3. स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय?

  4. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते; अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते.

  5. दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात; प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते.

  6. या प्रकियेत बोलणे नाही, शब्दही नाही, त्यात आवाजही नाही;

  7. तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे. परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे.

  8. आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे, जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो.

  9. तो आकाशाच्या एका टोकास उगवतो दुसर्‍या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो; त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.

  10. ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे.

  11. त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला, त्यांची करुणा सनातन आहे.

  12. त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या— त्यांची करुणा सनातन आहे.

  13. दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य, त्यांची करुणा सनातन आहे.

  14. रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले; त्यांची करुणा सनातन आहे.

  15. याहवेह असे म्हणतात, दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, व रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, गर्जना करणार्‍या लाटा उसळाव्यात म्हणून जे समुद्र ढवळतात; त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:

  16. “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात.

  17. याहवेह असे म्हणतात: “जर आकाशाचे मोजमाप करता आले असते व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता, तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,” याहवेह जाहीर करतात.