Aliens बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये.
“तुमच्याबरोबर राहणार्या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये.
तुमच्यामध्ये असलेले स्वदेशी असो वा तुमच्यामध्ये असलेले विदेशी असो, दोघांनाही एकच नियम असावा.”
“परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.
“परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.
“ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये.
जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘तुमचे पुरुष आणि स्त्री गुलाम तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांमधून यावेत; तुम्ही त्यांच्याकडून गुलाम विकत घेऊ शकता.
तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे काही तात्पुरते रहिवासी आणि तुमच्या देशात जन्मलेल्या त्यांच्या कुळातील सदस्यांना देखील विकत घेऊ शकता आणि ते तुमची मालमत्ता बनतील.
“ ‘तुमच्यामध्ये राहत असणार्या परदेशी व्यक्तीनेही विधी नियमानुसार याहवेहचा वल्हांडण पाळावा. परदेशी व स्वदेशी व्यक्तीसाठी सारखाच नियम असावा.’ ”
जेव्हा कोणी परदेशी किंवा तुमच्यामधील कोणीही इतर रहिवासी याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करतात, त्यांनीही तुम्ही ज्याप्रकारे करतात, त्याच पद्धतीने करावे, हे पुढील सर्व पिढ्यांपर्यंत असावे.
समुदायाने स्वतःसाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी सारखेच नियम पाळावे. येणार्या पिढ्यांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. तुम्ही व परदेशी याहवेहसमोर सारखेच आहात.
ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे.
आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.
तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता.
आधीच मृत्यू पावलेले असे काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या नगरात राहणार्या एखाद्या परकियाने ते खाण्यास हरकत नाही. किंवा परकियाला विकत द्यावा, परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. त्याच्या आईच्या दुधात करडाला कधीही शिजवू नये.
परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत.
तर ज्या माणसाची याहवेह तुमचे परमेश्वर निवड करतील, त्यालाच तुम्ही राजा म्हणून नेमावे. तो तुमच्या भाऊबंदांपैकी असावा; परदेशीयाला म्हणजे इस्राएली पैकी नसलेल्यास तुम्ही राजा म्हणून नेमू नये.
परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता.
तुम्ही एखाद्या परदेशीकडून व्याज घेऊ शकता, पण कोणाही इस्राएली बांधवाकडून घेऊ नका, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जेव्हा तुम्हाला वतन म्हणून ज्या देशात आणतील, तेव्हा तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याला आशीर्वाद देतील.
गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.
परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये.
“जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
त्यांच्यामध्ये राहणारा कोणा इस्राएली किंवा परदेशीयाने नकळतपणे कोणाची हत्या केली असेल, तर त्याने या नेमून दिलेल्या शहरांकडे पळून जावे, यासाठी की मंडळीसमोर खटल्यासाठी उभे राहण्याआधी रक्ताचा सूड घेणार्याकडून तो मारला जाऊ नये.
राजा गित्ती इत्तय याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येत आहे? परत जा आणि अबशालोम राजाबरोबर राहा. तू तर परदेशीय, तुझ्या जन्मभूमीतून बाहेर आलेला आहेस.