मुख्य मजकुरावर जा

Aliens बद्दल बायबलमधील वचने: To be treated with justice

13 वचने · 13 पैलू

To be treated with justice बद्दल वचने

  1. “परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.

  2. “परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.

  3. “ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये.

  4. जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  5. आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.

  6. तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता.

  7. गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.

  8. परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये.

  9. “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  10. जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही,

  11. याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.

  12. या देशातील लोक फसवणूक व लुटारूपण करतात; ते गरीब व गरजवंतावर अत्याचार करतात आणि विदेशी लोकांना न्याय न देता अन्यायाने वागवितात.

  13. “त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.