Skip to content

Aaron बद्दल बायबलमधील वचने

145 वचने · 27 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”

  2. नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”

  3. मोशेने सांगितल्याप्रमाणे अहरोनाने केले. तो लोकांमध्ये पळत गेला, कारण पीडा त्यांच्यामध्ये सुरू झाली होती. त्याने धूप जाळले आणि लोकांसाठी प्रायश्चित्त केले.

  4. मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली.

  5. याहवेह मोशेला म्हणाले,

  6. “इस्राएली लोकांशी बोल व त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी अशा बारा काठ्या घे. प्रत्येक पुरुषाचे नाव त्याच्या काठीवर लिही.

  7. लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्‍याची एक काठी असावी.

  8. सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या.

  9. ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”

  10. म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्‍यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती.

  11. मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.

  12. दुसर्‍या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले.

  13. मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्‍याने आपआपली काठी घेतली.

  14. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्‍यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.”

  15. याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले.

  16. इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत!

  17. जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?”

  18. याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार.

  19. याहवेह मोशे आणि अहरोनला म्हणाले:

  20. त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.

  21. मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?”

  22. मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले.

  23. परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”

  24. एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,

  25. “अहरोन आपल्या लोकांशी जाऊन मिळेल. इस्राएली लोकांना मी जो देश देत आहे त्यात तो प्रवेश करणार नाही, कारण मरीबाहच्या पाण्याकडे तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केले.