Aaron बद्दल बायबलमधील वचने: Commissioned as a deliverer of Israel
Commissioned as a deliverer of Israel बद्दल वचने
आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.
ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.”
हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले.
“ ‘नंतर मी मोशे आणि अहरोनला पाठविले आणि मी तिथे जे केले त्यामुळे इजिप्तच्या लोकांवर पीडा आल्या आणि मी तुम्हाला बाहेर आणले.
याकोबाने इजिप्तमध्ये प्रवेश केल्यानंतर साहाय्यासाठी ते याहवेहकडे रडले आणि याहवेहने मोशे आणि अहरोन यांना पाठविले, त्यांनी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणले आणि त्यांना या ठिकाणी वसविले.
मोशे व अहरोन यांच्याद्वारे मेंढरांच्या कळपाप्रमाणे तुम्ही आपल्या लोकांना नेले.
तेव्हा परमेश्वराने आपले प्रतिनिधी म्हणून मोशेला व अहरोनाला निवडून पाठवले.
मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले.