Skip to content

Aaron बद्दल बायबलमधील वचने: Not permitted to enter Canaan

8 वचने · 27 पैलू

Not permitted to enter Canaan बद्दल वचने

  1. परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”

  2. एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,

  3. “अहरोन आपल्या लोकांशी जाऊन मिळेल. इस्राएली लोकांना मी जो देश देत आहे त्यात तो प्रवेश करणार नाही, कारण मरीबाहच्या पाण्याकडे तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केले.

  4. अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा.

  5. अहरोनाची वस्त्रे काढून ती त्याचा पुत्र एलअज़ारला घाल, कारण तो त्याच्या लोकांशी जाऊन मिळेल; तो तिथे मरण पावेल.”

  6. जसे याहवेहने आज्ञापिले त्यानुसार मोशेने केले: सर्व समुदायादेखत ते होर पर्वतावर गेले.

  7. मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरविली आणि एलअज़ारावर चढविली आणि अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मरण पावला. नंतर मोशे आणि एलअज़ार डोंगरावरून खाली आले,

  8. आणि अहरोन मरण पावला असे जेव्हा समुदायाला समजले, तेव्हा सर्व इस्राएलने तीस दिवस शोक केला.