Skip to content

Aaron बद्दल बायबलमधील वचने: Descendants of

19 वचने · 27 पैलू

Descendants of बद्दल वचने

  1. अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.

  2. अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला.

  3. अम्रामाची संतती: अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र: नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.

  4. एलअज़ारास फिनहास, फिनहासास अबीशूवा,

  5. अबीशूवास बुक्की, बुक्कीस उज्जी,

  6. उज्जीस जरह्याह, जरह्याहास मरायोथ,

  7. मरायोथास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब,

  8. अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज,

  9. अहीमाजास अजर्‍याह, अजर्‍याहास योहानान,

  10. योहानान यास अजर्‍याह झाला. अजर्‍याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.

  11. अजर्‍याहास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब झाला,

  12. अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,

  13. शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,

  14. अजर्‍याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला.

  15. याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.

  16. अहरोनाचे वंशज: अहरोनाचा पुत्र एलअज़ार, त्याचा पुत्र फिनहास, त्याचा पुत्र अबीशूवा,

  17. त्याचा पुत्र बुक्की, त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जरह्याह,

  18. त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्‍याह, त्याचा पुत्र अहीतूब,

  19. त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमाज.