- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास २७:३१सुमारे इ.स.पू. १०१५
मेंढरांवर हगरी येथील याजीज देखरेख करत असे.
- 1 इतिहास २७:३२सुमारे इ.स.पू. १०१५
दावीदाचा चुलता योनाथान हा सुशिक्षित असून उत्तम सल्लागार व लेखनिक होता. हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांचा शिक्षक होता.
- 1 इतिहास २७:३३सुमारे इ.स.पू. १०१५
अहीथोफेल राजाचा सल्लागार होता. हूशाई अर्की खाजगी सल्लागार होता.
- 1 इतिहास २७:३४सुमारे इ.स.पू. १०१५
बेनाइयाहचा पुत्र यहोयादा आणि अबीयाथार नंतर अहीथोफेल त्यांच्या जागी आला. योआब राजाच्या शाही सेनेचा सरसेनापती होता.
- 1 इतिहास २८:१सुमारे इ.स.पू. १०१५
दावीदाने इस्राएलच्या सर्व अधिकार्यांना यरुशलेम येथे एकत्र बोलाविले: त्यात गोत्रावरील अधिकारी, राजकीय सेवेतील विभागीय अधिकारी, हजार सैन्याचे आणि शंभर सैन्याचे सैन्याधिकारी, राजा आणि राजपुत्र यांच्या स्थावर मालमत्तेची आणि पशुधनाची देखरेख करणारे अधिकारी, युद्ध सैनिक व सर्व वीर योद्धे यांचा समावेश होता.
- 1 इतिहास २८:२सुमारे इ.स.पू. १०१५
राजा दावीद उभा राहिला व म्हणाला: “माझ्या इस्राएली बंधूंनो, माझ्या लोकांनो, माझे ऐका. याहवेहच्या पवित्र कराराच्या कोशासाठी आणि परमेश्वराच्या पादास्थानासाठी एक भवन असावे म्हणून मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. आणि मी मंदिर बांधावयास योजना केली आहे.
- 1 इतिहास २८:३सुमारे इ.स.पू. १०१५
परंतु परमेश्वराने मला सांगितले आहे, ‘तू माझ्या नामासाठी भवन बांधणार नाही, कारण तू योद्धा आहेस आणि तू रक्तपात केला आहेस.’
- 1 इतिहास २८:४सुमारे इ.स.पू. १०१५
“तरीपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने माझ्या सर्व घराण्यातून इस्राएलावर सदासर्वदा राज्य करण्यासाठी मला राजा म्हणून निवडले आहे. त्यांनी प्रथम यहूदाहच्या गोत्राची आणि या गोत्रातून माझ्या पित्याच्या घराण्याची आणि माझ्या पित्याच्या सर्व पुत्रांमधून माझी निवड करून आनंद मानला असून मला इस्राएलावर राजा केले आहे.
- 1 इतिहास २८:५सुमारे इ.स.पू. १०१५
याहवेहने मला पुष्कळ पुत्र दिलेले आहेत—माझ्या अनेक पुत्रांमधून—याहवेहने इस्राएलींच्या राजगादीवर बसण्यासाठी माझा पुत्र शलोमोन याची निवड केली.
- 1 इतिहास २८:६सुमारे इ.स.पू. १०१५
याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.
- 1 इतिहास २८:७सुमारे इ.स.पू. १०१५
त्याने माझ्या आज्ञा आणि सूचना आतापर्यंत पाळल्या, त्याप्रमाणे जर तो यापुढेही काटेकोरपणाने पाळल्या, तर मी त्याचे राज्य सदासर्वकाळ टिकवेन.’
- 1 इतिहास २८:८सुमारे इ.स.पू. १०१५
“म्हणून आता सर्व इस्राएलसमोर, याहवेहच्या लोकांसमोर आणि आपल्या परमेश्वराच्या ऐकिवात: मी तुम्हाला सूचना देत आहे की याहवेह परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही ही उत्तम भूमी ताब्यात घेऊन, ती सदासर्वदा तुमच्या वंशजांना वारसाहक्क म्हणून देता येईल.
- 1 इतिहास २८:९सुमारे इ.स.पू. १०१५
“आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.
- 1 इतिहास २८:१०सुमारे इ.स.पू. १०१५
म्हणून आता तू लक्ष दे, याहवेहने त्यांचे पवित्र मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे. शक्तिशाली हो आणि ते कार्य पूर्ण कर.”
- 1 इतिहास २८:११सुमारे इ.स.पू. १०१५
नंतर दावीदाने मंदिराची नियोजित जागा, तेथील भवने, भांडारगृहे, वरच्या खोल्या, आतील खोल्या, तसेच प्रायश्चिताची जागा यांचा नकाशा शलोमोनाला दिला.
- 1 इतिहास २८:१२सुमारे इ.स.पू. १०१५
पवित्र आत्म्याने ज्या योजना त्याच्या मनात घातल्या होत्या त्या याहवेहच्या मंदिराच्या अंगणाचा, सभोवतालच्या खोल्यांचा, परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यांचा व समर्पित वस्तूंच्या कोठारांचाही नकाशा त्याला दिला.
- 1 इतिहास २८:१३सुमारे इ.स.पू. १०१५
याजक व लेवी यांच्या विभागांच्या कामकाजाच्या सूचनाही राजाने शलोमोनाला दिल्या, त्याचप्रमाणे याहवेहच्या मंदिरातील भक्ती व सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा तपशीलही त्याने त्याला दिला.
- 1 इतिहास २८:१४सुमारे इ.स.पू. १०१५
त्याने वजन करून निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या सोन्याच्या पात्रांसाठी लागणारे पुरेसे सोने व निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी लागणारी पुरेशी चांदी दिली.
- 1 इतिहास २८:१५सुमारे इ.स.पू. १०१५
दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली.
- 1 इतिहास २८:१६सुमारे इ.स.पू. १०१५
त्याने समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी व इतर सोन्याच्या मेजांसाठी सोने तोलून दिले. त्याने चांदीच्या मेजांसाठीसुध्दा चांदी तोलून दिली.
- 1 इतिहास २८:१७सुमारे इ.स.पू. १०१५
शुद्ध सोन्याचे काटेरी चमचे, शिंपडण्यासाठी लागणारे कटोरे आणि प्याले; सोन्याच्या प्रत्येक ताटासाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक ताटासाठी चांदी तोलून दिली;
- 1 इतिहास २८:१८सुमारे इ.स.पू. १०१५
आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला.
- 1 इतिहास २८:१९सुमारे इ.स.पू. १०१५
दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.”
- 1 इतिहास २८:२०सुमारे इ.स.पू. १०१५
दावीद त्याचा पुत्र शलोमोनला हे देखील म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि कामास लाग, भिऊ नकोस किंवा खचू नकोस, कारण याहवेह परमेश्वर, माझे परमेश्वर तुझ्याबरोबर आहेत. याहवेहच्या मंदिराचे प्रत्येक कार्य योग्यप्रकारे सिद्धीस जाईपर्यंत ते तुझा त्याग करणार नाहीत किंवा तुला अपयश देणार नाहीत.
- 1 इतिहास २८:२१सुमारे इ.स.पू. १०१५
याजक आणि लेवी यांच्या विभागणी प्रमाणे परमेश्वराच्या मंदिरातील सर्व कामे करण्यास तयार आहेत आणि तसेच निरनिराळ्या कारागिरीमध्ये कुशल असलेला प्रत्येक उत्सुक मनुष्य तुला सर्व कामात मदत करण्यास तयार आहे. अधिकारी वर्ग आणि सामान्य लोक तुझ्या प्रत्येक आज्ञेप्रमाणे वागतील.”