circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक १३:२७सुमारे इ.स. ३३
“त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’
- लूक १३:२८सुमारे इ.स. ३३
“अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल.
- लूक १३:२९सुमारे इ.स. ३३
पूर्व आणि पश्चिमेकडून, उत्तर व दक्षिणेकडून लोक येतील, आणि परमेश्वराच्या राज्याच्या मेजवानीत सामील होऊन आपआपल्या जागा घेतील.
- लूक १३:३०सुमारे इ.स. ३३
खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”
- लूक १३:३१सुमारे इ.स. ३३
काही परूशी येशूंकडे येऊन त्यांना म्हणाले, “आपण येथून निघून जा, कारण हेरोद राजा आपणास जिवे मारावयास पाहत आहे.”
- लूक १३:३२सुमारे इ.स. ३३
येशूंनी उत्तर दिले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, की ‘मी आज व उद्या भुते काढीत आणि रोग बरे करीत राहीन आणि तिसर्या दिवशी माझा उद्देश पूर्ण करेन.’
- लूक १३:३३सुमारे इ.स. ३३
काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही.
- लूक १३:३४सुमारे इ.स. ३३
“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.
- लूक १३:३५सुमारे इ.स. ३३
आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो’ असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.”
- लूक १४:१सुमारे इ.स. ३३
एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परूश्याच्या घरी जेवावयास गेले असताना त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते.
- लूक १४:२सुमारे इ.स. ३३
तिथे त्यांच्यासमोर शरीरावर असाधारण सूज असलेला एक मनुष्य होता.
- लूक १४:३सुमारे इ.स. ३३
परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?”
- लूक १४:४सुमारे इ.स. ३३
परंतु ते शांत राहिले. येशूंनी त्या आजारी मनुष्याचा हात धरून त्याला बरे केले आणि जाऊ दिले.
- लूक १४:५सुमारे इ.स. ३३
नंतर ते म्हणाले, “जर तुमचे लहान लेकरू किंवा बैल शब्बाथ दिवशी विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही का?”
- लूक १४:६सुमारे इ.स. ३३
पण ते काहीच बोलले नाही.
- लूक १४:७सुमारे इ.स. ३३
पाहुणे पंक्तीत मानाच्या जागा पटकावण्याच्या खटपटीत असलेले पाहून त्यांनी त्यास दाखला सांगितला
- लूक १४:८सुमारे इ.स. ३३
“तुम्हाला कोणी लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण दिले, तर मानाची जागा घेऊ नका, कारण तुमच्यापेक्षा अधिक आदरणीय व्यक्तीस आमंत्रण दिले असेल
- लूक १४:९सुमारे इ.स. ३३
तर आमंत्रण देणारा, ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हाला म्हणेल, ‘या गृहस्थांना या जागेवर बसू द्या.’ तेव्हा तुमचा अपमान होईल व कमी प्रतीच्या जागेवर जाऊन बसावे लागेल.
- लूक १४:१०सुमारे इ.स. ३३
परंतु जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलेले असेल तर खालच्या जागेवर जाऊन बसा, म्हणजे जेव्हा तुमचा यजमान येतो, तो तुम्हाला म्हणेल, ‘मित्रा, चांगल्या जागेवर ये.’ तेव्हा दुसर्या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुमचा सन्मान होईल.
- लूक १४:११सुमारे इ.स. ३३
कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.”
- लूक १४:१२सुमारे इ.स. ३३
नंतर येशू यजमानास म्हणाले, “जेव्हा तुम्ही दुपारी व संध्याकाळी मेजवानी देता, त्यावेळी तुमचे मित्र, भाऊ किंवा बहीण, नातेवाईक आणि श्रीमंत शेजारी यांना आमंत्रण देऊ नका, जर तुम्ही तसे कराल तर ते तुमच्या आमंत्रणाची परतफेड करतील.
- लूक १४:१३सुमारे इ.स. ३३
तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या.
- लूक १४:१४सुमारे इ.स. ३३
म्हणजे नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी, ज्यांना परतफेड करता येत नाही, अशा लोकांना दिल्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद दिला जाईल.”
- लूक १४:१५सुमारे इ.स. ३३
येशूंच्या बरोबर पंक्तीस बसलेल्या एकाने हे ऐकले, व तो येशूंना म्हणाला, “धन्य आहे तो मनुष्य, जो परमेश्वराच्या राज्यातील मेजवानीत भोजन करेल.”
- लूक १४:१६सुमारे इ.स. ३३
येशूंनी उत्तर दिले: “एक मनुष्य मोठी मेजवानी देण्याची तयारी करत होता आणि त्याने अनेक पाहुण्यांना आमंत्रणे दिली.