मुख्य मजकुरावर जा

Pontius

54 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Pontius Pilate, Pilate

Pontius चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते.

  2. नंतर पिलाताने प्रमुख याजक, अधिकारी आणि लोक यांना एकत्र बोलावून म्हटले,

  3. येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला

  4. आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले.

  5. पिलाताकडे जाऊन त्याने येशूंचे शरीर मिळण्यासाठी विनंती केली.

  6. तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर आला आणि त्याने त्यांना विचारले, “या मनुष्याविरुद्ध तुमचे काय आरोप आहेत?”

  7. पिलात त्यांना म्हणाला, “त्याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” ते विरोध करून म्हणाले, “मृत्युदंड देण्याचा अधिकार आम्हाला नाही.”

  8. मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

  9. तेव्हा प्रत्युत्तर करीत पिलात म्हणाला, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केले नाही का? तू काय केले?”

  10. यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.”

  11. पिलाताने उलट विचारले, “सत्य काय आहे?” मग तो पुन्हा यहूदी जिथे जमले होते तिथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, “त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही.

  12. मग पिलाताने येशूंना फटके मारविले.

  13. मग पिलात पुन्हा एकदा बाहेर आला आणि तिथे जमलेल्या यहूद्यांना म्हणाला, “पाहा, मी आता त्याला तुमच्यापुढे बाहेर आणत आहे, परंतु लक्षात ठेवा की मला त्याच्या ठायी कोणताही अपराध सापडला नाही.”

  14. येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!”

  15. येशूंना पाहताच मुख्य याजक व त्यांचे अधिकारी ओरडू लागले, “क्रूसावर खिळा! क्रूसावर खिळा!” परंतु पिलाताने उत्तर दिले, “तुम्हीच त्याला घेऊन जा आणि त्याला क्रूसावर खिळा. कारण माझ्या दृष्टीने पाहिले तर, त्याच्यावर दोष ठेवण्यासाठी मला कोणताही आधार सापडत नाही.”

  16. हे ऐकल्यावर पिलात, अधिकच घाबरला.

  17. पिलाताने म्हटले, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला सोडण्याचा अथवा तुला क्रूसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला कळत नाही का?”

  18. तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.”

  19. हे ऐकल्यावर, पिलाताने येशूंना बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला अरामी भाषेत गब्बाथा म्हणतात, तिथे तो न्यायासनावर बसला

  20. पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!” तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?” त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.”

  21. पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू.

  22. मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.”

  23. तेव्हा पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.”

  24. आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्‍या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्‍यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील.

  25. त्यानंतर अरिमथियाकर योसेफाने येशूंचे शरीर पिलाताकडे मागितले. आता योसेफ येशूंचा एक गुप्त अनुयायी असून यहूदी पुढार्‍यांना भीत होता. पिलाताच्या परवानगीने, तो आला आणि येशूंचे शरीर घेऊन गेला.