मुख्य मजकुरावर जा

Joseph

199 वचने · 17 कुटुंब सदस्य

Joseph चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले.

  2. योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला.

  3. जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?”

  4. यावर योसेफाने उत्तर दिले, “तुमचे पैसे संपले आहेत, तर मग तुमची गुरे मला द्या आणि त्यांच्या मोबदल्यात मी तुम्हाला अन्नधान्य देतो.”

  5. त्याप्रमाणे अन्नधान्यासाठी लोकांनी आपले सर्व घोडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि गाढवे योसेफाकडे आणली आणि त्याने त्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य दिले.

  6. याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली,

  7. मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा.

  8. म्हणून योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी शिवाय इतर सर्व जमिनीतील पिकांचा पाचवा हिस्सा फारोहला देण्यात यावा, असा इजिप्त देशभर कायदा केला. हा कायदा आजवर चालू आहे.

  9. इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस,

  10. काही दिवसानंतर योसेफाला कळविण्यात आले, “तुझे वडील आजारी आहेत.” तेव्हा तो मनश्शेह व एफ्राईम या आपल्या दोन पुत्रांना आपल्यासोबत घेऊन निघाला.

  11. जेव्हा याकोबाला सांगण्यात आले, “तुझा पुत्र योसेफ तुझ्याकडे आला आहे,” तेव्हा इस्राएल आपली सर्व शक्ती एकवटून उठून बिछान्यावर बसला.

  12. याकोब हा योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वराने मला कनान देशात लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला

  13. जेव्हा इस्राएलने योसेफाच्या पुत्रांना पाहिले, त्याने विचारले, “ही कोण आहेत?”

  14. योसेफाने त्याच्या पित्याला म्हटले, “परमेश्वराने मला इथे दिलेले हे माझे पुत्र आहेत.” इस्राएल त्याला म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण आणि म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

  15. इस्राएल योसेफाला म्हणाला, “मी तुला परत पाहीन असे मला कधीच वाटले नव्हते, पण परमेश्वराने मला तुझे पुत्रही पाहू दिलेत.”

  16. नंतर योसेफाने त्यांना इस्राएलाच्या मांडीवरून बाजूला केले आणि जमिनीपर्यंत लवून मुजरा केला.

  17. मग योसेफाने दोघांना घेतले आणि एफ्राईमला योसेफाच्या उजव्या व इस्राएलाच्या डाव्या हातास आणि मनश्शेहला योसेफाच्या डाव्या आणि इस्राएलाच्या उजव्या हातास असे त्याच्याजवळ नेले.

  18. नंतर त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या परमेश्वरापुढे माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक विश्वासाने चालले, तेच परमेश्वर आजपर्यंत माझ्या जीवनाचे मेंढपाळ राहिले आहे,

  19. त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला.

  20. योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.”

  21. नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील.

  22. “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.

  23. तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.

  24. योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.

  25. नंतर योसेफाने वैद्यास त्याचा पिता इस्राएल याच्या मृतदेहात मसाला भरण्याची आज्ञा दिली. मग वैद्यांनी मृतदेहात सुगंधी द्रव्याचा मसाला भरला.