मुख्य मजकुरावर जा

Job

53 वचने · 3 कुटुंब सदस्य

Job चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता.

  2. तीन मित्रांवर देखील तो संतापला कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे इय्योबाचे खंडन केले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी परमेश्वराला दोषी ठरविले होते.

  3. एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते.

  4. लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले. परंतु तुमच्यातील एकानेही इय्योबाला चुकीचे असे सिध्‍द केले नाही; तुमच्यापैकी कोणीही त्याच्या वादास प्रत्युत्तर केले नाही.

  5. “परंतु आता हे इय्योबा, माझे शब्द ऐक; मी जे बोलणार आहे त्या सर्वाकडे लक्ष दे.

  6. “हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक; तू शांत राहा आणि मी बोलेन.

  7. “इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे, परंतु परमेश्वर मला न्याय देत नाहीत.

  8. इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय, जो पाण्याप्रमाणे उपहास पितो?

  9. ‘इय्योब अज्ञानाने बोलत आहे; त्याच्या बोलण्यात सुज्ञता नाही.’

  10. त्या इय्योबाची पूर्णपणे पारख केली जावी कारण तो दुष्‍टांप्रमाणे बोलत आहे!

  11. म्हणून इय्योब रिकाम्या शब्दांनी आपले मुख उघडतो; आणि ज्ञानाशिवाय शब्द वाढवित राहतो.”

  12. “हे इय्योबा, लक्षपूर्वक ऐक; थांब आणि परमेश्वराची आश्चर्यकर्मे समजून घे.

  13. मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले:

  14. याहवेहने इय्योबास पुढे म्हटले,

  15. तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:

  16. मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले:

  17. मग इय्योबाने याहवेहला म्हटले,

  18. याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, “मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत.

  19. म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.”

  20. मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली.

  21. इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले

  22. याहवेहने इय्योबाच्या जीवनाच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या उतार वयात त्याला अधिक आशीर्वादित केले. त्याच्याजवळ चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या व हजार गाढवे होती.

  23. संपूर्ण देशामध्ये इय्योबाच्या मुलींएवढ्या सुंदर मुली कुठेही नव्हत्या; त्यांच्या पित्याने त्यांच्या भावांबरोबर त्यांनाही वतन दिले.

  24. त्यानंतर इय्योब एकशेचाळीस वर्षे जगला; त्याने आपली लेकरे व त्यांची लेकरे अशा चार पिढ्या पाहिल्या.

  25. इय्योब वयस्कर व पूर्ण परिपक्व होऊन मरण पावला.