Eliphaz बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.
एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते.
एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.
रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.
एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.
एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,
कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.
याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, “मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत.
म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.”
मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली.