Skip to content

Zophar बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जेव्हा इय्योबाचे तीन मित्र एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी इय्योबावर आलेल्या संकटांविषयी ऐकले, ते आपआपल्या घरून निघाले; इय्योबाकडे आपण मिळून जावे व त्याला सहानुभूती दाखवून त्याचे सांत्वन करावे असे त्यांनी एकमताने ठरविले.

  2. याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, “मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत.

  3. म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.”

  4. मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली.