मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.”

  2. मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.”

  3. आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते.

  4. परंतु त्या इस्राएलाच्या वडिलांविरुद्ध परमेश्वराने आपला हात उगारला नाही; त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि त्यांनी खाणेपिणे केले.

  5. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.”

  6. मग मोशे व त्याचा मदतनीस यहोशुआ उठले आणि मोशे पर्वतावर परमेश्वराकडे गेला.

  7. आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.

  8. इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे दिसले.

  9. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  10. “इस्राएली लोकांना सांग की, त्यांनी मला अर्पण आणावे. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून ते तू माझ्यावतीने स्वीकारावे.

  11. “मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.

  12. हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.

  13. मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात.

  14. हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात.

  15. तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.

  16. त्या मेजावर माझ्यासमोर समक्षतेची भाकर नेहमी ठेवलेली असावी.

  17. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”

  18. “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.

  19. ज्यांना अशा बाबतीत मी ज्ञान दिले आहे, त्या सर्व कुशल कारागिरांना सांग की अहरोनाच्या पवित्रीकरणासाठी त्यांनी वस्त्रे बनवावी, यासाठी की त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी.

  20. त्यांनी जी वस्त्रे बनवावी ती ही: ऊरपट, एफोद, एक झगा, भरतकाम केलेला अंगरखा, फेटा व कमरबंद. त्यांनी ही पवित्र वस्त्रे तुझा भाऊ अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी बनवावी, यासाठी की याजक म्हणून त्यांनी माझी सेवा करावी.

  21. आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी.

  22. “अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.

  23. जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्‍या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”

  24. अहरोनाने तो झगा सेवा करीत असताना घालावा. जेव्हा तो याहवेहसमोर पवित्रस्थानात जातो व बाहेर येतो त्यावेळी घंट्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणजे तो मरणार नाही.

  25. “शुद्ध सोन्याची एक पाटी तयार करावी आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तशी ही अक्षरे कोरावीत: याहवेहसाठी पवित्र.