- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
God
God चा उल्लेख असलेली वचने
ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”
तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांच्या अंगावर ही वस्त्रे घातल्यावर, त्यांचा अभिषेक आणि समर्पण कर. त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र कर.
“त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी असेच करावे: एक निर्दोष गोर्हा व दोन मेंढे घ्यावेत.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्हा वधावा.
मग संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम कर. तो याहवेहसाठी होमार्पण आहे, ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे.
बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर आहे, त्यातून एक गोल भाकर घे, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घे.
हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवावे आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी करावी.
मग ते त्यांच्या हातातून घेऊन होमार्पणाबरोबर वेदीवर जाळावे, याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण असे सादर करावे.
मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील.
हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.
“मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी तू करावे, त्यांच्या समर्पणास सात दिवस घ्यावे.
संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.
“हे होमार्पण येणार्या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.
तिथे मी इस्राएली लोकांना देखील भेटेन आणि ते ठिकाण माझ्या तेजाने पवित्र होईल.
“तर मी सभामंडप व वेदी पवित्र करेन आणि अहरोन व त्याचे पुत्र यांना याजक म्हणून माझी सेवा करावी यासाठी पवित्र करेन.
मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन.
त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.”
कराराच्या कोशासमोर लावलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूस, प्रायश्चिताचे झाकण जे कराराच्या नियमाच्या पाटींवर आहे; तिथे वेदी ठेवावी; तिथेच मी तुला भेटत जाईन.
पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा.
अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.”
मग याहवेह मोशेला म्हणाले,
“तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.
प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.
जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे.
जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.