मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा फारोह त्यांना म्हणाला, “मी तुमच्या मुलाबाळांस व स्त्रियांना जाऊ दिले तर याहवेह तुम्हाबरोबर असो! खचितच तुम्ही दुष्टता योजली आहे.

  2. नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले.

  3. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू आपला हात इजिप्त देशावर लांब कर म्हणजे टोळधाड येईल व गारांच्या वर्षावातून वाचलेली वनस्पती जी भूमीवर वाढत आहे त्या सर्वांचा ती नाश करेल.”

  4. तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्‍याने टोळ आणले.

  5. मग फारोहने मोशे व अहरोन यांना त्वरेने बोलावून घेतले आणि म्हटले, “मी तुमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  6. परत एकदा माझ्या पापाची मला क्षमा करा आणि तुमच्या याहवेह परमेश्वराने ही पीडा माझ्यापासून दूर करावी म्हणून त्यांच्याकडे विनंती करा.”

  7. मग मोशे फारोह पुढून निघून गेला व त्याने याहवेहकडे प्रार्थना केली;

  8. आणि याहवेहने पश्चिमेच्या दिशेने वार्‍याची दिशा बदलली व त्या वार्‍याने टोळांना एकवटून तांबड्या समुद्रात टाकले. इजिप्तमध्ये एकही टोळ शिल्लक राहिला नाही.

  9. पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.

  10. नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.”

  11. तेव्हा फारोहने मोशेला बोलावून घेतले. तो म्हणाला, “जा, आणि याहवेहची उपासना करा. तुमच्या स्त्रिया व लेकरे सुद्धा तुमच्याबरोबर जाऊ शकतात; तुमची जनावरे व शेरडेमेंढरे मात्र सोडून जा.”

  12. परंतु मोशे म्हणाला, “याहवेह, आमचा परमेश्वर यास आम्ही यज्ञ व होमबली अर्पण करावे म्हणून जाऊ दे.

  13. आमची जनावरे सुद्धा आमच्याबरोबर गेली पाहिजेत; एक खूर देखील आम्ही मागे ठेवणार नाही. आम्हाला त्यांच्यापैकी काहींचा याहवेह आमचे परमेश्वर यांची उपासना करण्यास वापर करावयाचा आहे, आणि त्यात आम्ही काय वापरावे हे आम्ही त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्हाला समजणार नाही.”

  14. पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले, व तो त्यांना जाऊ देण्यास मान्यता देईना.

  15. मग याहवेह मोशेला म्हणाले, “मी फारोह व इजिप्तवर आणखी एक पीडा आणेन. त्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणाहून जाऊ देईल आणि जेव्हा तो हे करेल तेव्हा तो तुम्हाला अक्षरशः देशातून घालवून देईल.

  16. (आता याहवेहने इजिप्तमधील लोकांची मने इस्राएलांना अनुकूल होतील असे केले, मोशे स्वतः इजिप्तमध्ये फारोहच्या सेवकांच्या व इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीत फार थोर झाला होता.)

  17. मग मोशे म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मध्यरात्रीच्या सुमारास मी इजिप्तमधून फिरेन.

  18. परंतु इस्राएली व्यक्तीवर किंवा पशूंवर कुत्रेदेखील भुंकणार नाही.’ यावरून मी याहवेह इजिप्त व इस्राएल यांच्यामध्ये कसा भेद करतो, हे तुम्हाला समजेल.

  19. याहवेहने मोशेला आधीच सांगितले होते, “इजिप्त देशात मी पुष्कळ चमत्कार करावे म्हणून फारोह तुमचे ऐकण्यास नाकारेल.”

  20. मोशे व अहरोन यांनी फारोहसमक्ष हे सर्व चमत्कार केले, पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली नाही.

  21. मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले,

  22. तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण आहे.

  23. “कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.

  24. तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.

  25. “हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा.