मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले.

  2. नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.

  3. ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’

  4. आज त्याने खाली जाऊन पुष्कळ संख्येने गुरे, पुष्ट वासरे आणि मेंढरांचा यज्ञ केला आहे. त्याने सर्व राजपुत्र, सैन्यांचे सेनापती आणि अबीयाथार याजक यांना आमंत्रित केले आहे. सध्या यावेळी ते त्याच्यासोबत खात व पीत आहेत आणि म्हणत आहेत, ‘राजा अदोनियाह चिरायू होवो!’

  5. तेव्हा राजाने शपथ वाहून म्हटले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले, त्या जिवंत याहवेहची शपथ,

  6. याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने जे मी तुला शपथ घेऊन म्हटले होते की: तुझा पुत्र शलोमोन माझ्यानंतर राजा होईल आणि तोच माझ्या जागेवर माझ्या राजासनावर बसेल, ते मी आज खचितच पूर्ण करेन.”

  7. तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’

  8. यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत.

  9. याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”

  10. सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेलाचे शिंग घेतले आणि शलोमोनचा अभिषेक केला. नंतर त्यांनी कर्णे वाजविले आणि “शलोमोन राजा चिरायू असो! असा सर्व लोकांनी जयघोष केला.”

  11. तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले

  12. आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ”

  13. आणि याहवेह तुझे परमेश्वर काय म्हणतात त्याकडे लक्ष दे: मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे याहवेहच्या आज्ञांचे पालन कर आणि त्यांचे नियम आणि आज्ञा, त्यांचे निर्णय आणि निर्बंध पाळ. असे केल्याने जे काही तू करशील आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील.

  14. आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’

  15. “आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती.

  16. तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला तर ठाऊकच आहे की वास्तविकता राज्य माझे होते. त्यांचा राजा म्हणून सर्व इस्राएलची नजर माझ्याकडे होती. परंतु ते पालटले आणि राज्य माझ्या भावाकडे गेले आहे; कारण त्याला ते याहवेहकडून आले आहे.

  17. तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो!

  18. तर आता, ज्यांनी मला माझे पिता दावीदाच्या राजासनावर स्थापित केले आहे आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे माझे घराणे स्थापित केले आहे, ते याहवेह जिवंत आहेत; आज अदोनियाहला जिवे मारले जाईल!”

  19. राजा अबीयाथार याजकाला म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेताकडे परत जा. वास्तविक तू सुद्धा मरण्यास पात्र आहे, परंतु मी तुला आता मारणार नाही, कारण माझे पिता दावीद याच्यासमोर तू सार्वभौम याहवेहचा कोश वाहिला आणि माझे पिता दावीदाच्या सर्व कष्टांमध्ये तू सहभागी होतास.”

  20. म्हणून शलोमोनने अबीयाथारला याहवेहच्या याजकपदावरून काढून टाकले, याप्रकारे एलीच्या घराण्याबद्दल याहवेहने शिलोह येथे बोललेले शब्द पूर्णतेस आले.

  21. जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता.

  22. शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.”

  23. तेव्हा बेनाइयाह याहवेहच्या मंडपामध्ये गेला आणि योआबाला म्हणाला, “राजा म्हणतो ‘बाहेर ये!’ ” परंतु त्याने उत्तर दिले, “नाही, मी येथेच मरेन.” तेव्हा बेनाइयाहने राजाला कळवले, “योआबाने मला असे उत्तर दिले.”

  24. त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.

  25. त्यांच्या रक्ताचा दोष योआबाच्या व त्याच्या वंशजांच्या माथ्यावर सर्वकाळ असो. परंतु दावीद व त्याचे वंशज, त्याचे घराणे आणि त्याचे राजासन यावर याहवेहची शांती सदा असो.”