1 इतिहास१८
Listen to this chapter
0:00
0:00
शेजारी राष्ट्रांवर दावीदाचे विजय
१
काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.
२
दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.
३
याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला.
४
दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.
५
जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले.
६
नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
७
हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.
८
हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.
हमाथकडून नजराणा व लुटीचे समर्पण
९
हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,
१०
तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या.
११
दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.
१२
जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले.
१३
त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
दावीदाचे प्रशासन व अधिकारी
१४
दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे.
१५
जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा.
१६
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख याजक; शावेशा राजाचा चिटणीस होता.
१७
यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note