गणना ३२:२०-३३
२०
तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही हे कराल, म्हणजे जर तुम्ही याहवेहसमोर युद्धासाठी स्वतःला हत्यारबंद कराल
२१
आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल;
२२
तर जेव्हा याहवेहपुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही परत जा व याहवेहच्या व इस्राएलच्या कर्तव्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश याहवेहसमोर तुमचे वतन होईल.
२३
“परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार.
२४
तुमच्या स्त्रिया व लेकरांकरिता नगरे व तुमच्या गुरामेंढरांकरिता वाडे बांधा, परंतु तुम्ही वचन दिल्याप्रमाणे करा.”
२५
गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू.
२६
आमची लेकरे, स्त्रिया, आमचे कळप आणि गुरे या ठिकाणी गिलआदाच्या शहरांमध्ये राहतील.
२७
पण तुझे सेवक, म्हणजे युद्धासाठी हत्यारबंद झालेला प्रत्येक पुरुष, जसे आमचे प्रभू सांगतात त्याप्रमाणेच युद्धासाठी याहवेहपुढे पार जातील.”
२८
नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली.
२९
मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा.
३०
पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.”
३१
गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे.
३२
आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.”
३३
तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.
Settings