Skip to content

Wise Men बद्दल बायबलमधील वचने

23 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. दुसर्‍या दिवशी सकाळी, स्वप्नांचा विचार करता फारोह चिंताक्रांत झाला. मग त्याने इजिप्तमधील सर्व ज्योतिष्यांना व ज्ञानी पुरुषांना बोलाविले आणि त्यांना आपले स्वप्न सांगितले. परंतु त्यापैकी एकालाही त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे सांगता येईना.

  2. या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.”

  3. तेव्हा फारोहने इजिप्तच्या ज्ञानी व मांत्रिकांना बोलाविले. त्यांनीही आपल्या गुप्त ज्ञानानुसार तसेच केले:

  4. परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती.

  5. पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते.

  6. इतर मनुष्यांपेक्षा, म्हणजेच एज्रावासी एथान, माहोलचे पुत्र हेमान, कल्कोल व दारदापेक्षा शलोमोन ज्ञानी होता. आणि त्याची किर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पसरली.

  7. शलोमोनने तीन हजार नीतिसूत्रे आणि एक हजार पाच गीते रचली.

  8. लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्‍या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले.

  9. शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत.

  10. “हे स्वप्न आहे जे मी, राजा नबुखद्नेस्सरने पाहिले. हे बेलटशास्सर, आता याचा अर्थ काय तो मला सांग, कारण माझ्या राज्यात कोणताही ज्ञानी मनुष्य मला त्याचा अर्थ सांगू शकत नाही. फक्त तूच मला अर्थ सांगू शकशील, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्यामध्ये आहे.”

  11. नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना.

  12. येशूंचा जन्म हेरोद राजाच्या कारकिर्दीत, यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले.

  13. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.”

  14. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले.

  15. हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे महायाजक व नियमशास्त्र शिक्षकांना एकत्र बोलाविले आणि विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा?”

  16. “यहूदीयातील बेथलेहेमात,” त्यांनी उत्तर दिले, “कारण संदेष्ट्याने असे लिहिले आहे:

  17. “ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा, यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ”

  18. मग हेरोदाने त्या खगोल शास्त्रज्ञांना खासगी निरोप पाठवून बोलावून घेतले आणि तारा नक्की कोणत्या वेळी प्रकट झाला याची माहिती मिळविली.

  19. मग हेरोदाने त्यांना बेथलेहेमात पाठविले आणि म्हणाला, “जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा; तो सापडल्यावर, इकडे परत या आणि मला सांगा, म्हणजे मी सुद्धा जाऊन त्यांची उपासना करेन.”

  20. राजाचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर ते शास्त्रज्ञ पुढे निघाले, जो तारा त्यांनी पाहिला होता, तो तारा बालक जिथे होता, तिथे येईपर्यंत त्यांच्यापुढे चालला.

  21. तो तारा पाहून त्यांना फार आनंद झाला.

  22. ज्या घरात बालक व त्याची आई मरीया होती, तिथे ते गेले आणि त्यांनी दंडवत घालून त्याला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस हे अर्पण केले.

  23. पण स्वप्नाद्वारे हेरोदाकडे न जाण्याची सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्‍या रस्त्याने त्यांच्या देशी परत गेले.