मुख्य मजकुरावर जा

The Sword बद्दल बायबलमधील वचने: Suspended from the girdle

4 वचने · 44 पैलू

Suspended from the girdle बद्दल वचने

  1. दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला.

  2. ते गिबोनातील मोठ्या खडकाजवळ आले, तेव्हा अमासा त्यांना भेटण्यास आला. योआबाने त्याचा लष्करी अंगरखा घातला होता आणि वरून कंबरपट्टा व म्यानात खंजीर होता. जसा तो पुढे गेला, त्याच्या म्यानातून खंजीर बाहेर पडला.

  3. आपल्या कमरेला तलवारी लटकवून प्रत्येकजण काम करीत असत. मात्र रणशिंग वाजविणारा माझ्याजवळच असे.

  4. हे शूर वीरा, तू आपली तलवार बांध; तू वैभव व प्रताप धारण कर.