मुख्य मजकुरावर जा

Shem बद्दल बायबलमधील वचने: Descendants of

70 वचने · 4 पैलू

Descendants of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.

  2. याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.

  3. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.

  4. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.

  5. अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला.

  6. एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.

  7. योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

  8. हदोराम, ऊजाल, दिक्लाह,

  9. ओबाल, अबीमाएल, शबा,

  10. ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.

  11. (ते मेशापासून सफार या पूर्वेकडील डोंगरापर्यंतच्या भागात राहत होते.)

  12. कुळे, भाषा, देश आणि राष्ट्रे अशाप्रकारे गोत्रानुसार विभागणी केलेले शेमचे हे वंशज होते.

  13. शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.

  14. अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  15. अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.

  16. शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  17. जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला.

  18. आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  19. एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता.

  20. पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  21. पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.

  22. रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  23. रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.

  24. सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  25. सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.