Skip to content

Secretary बद्दल बायबलमधील वचने: General references

25 वचने · 2 पैलू

General references बद्दल वचने

  1. अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता;

  2. अदोनिराम वेठबिगारी करणार्‍यांचा अधिकारी होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता;

  3. शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा;

  4. जेव्हाही ते पाहत की पेटीमध्ये अधिक पैसा जमा झाला आहे, तेव्हा राजाचा चिटणीस आणि प्रमुख याजक येत आणि याहवेहच्या मंदिरात आलेला पैसा मोजून पिशव्यांत भरून ठेवीत असे.

  5. रक्कम मोजून आणि तोलून झाल्यानंतर मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या माणसांना पैसे देण्यात येत असत. त्याद्वारे त्यांनी याहवेहच्या मंदिरावर काम करणारे सुतार आणि बांधकाम करणारे,

  6. गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले.

  7. त्यांनी राजाला बोलाविले; तेव्हा त्याच्या राजवाड्याचा कारभारी एल्याकीम जो हिल्कियाहचा पुत्र, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र होता हे त्याच्याकडे गेले.

  8. यानंतर हिल्कियाहचा पुत्र राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

  9. वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यदीदाह होते. ती बसकाथ येथील अदायाहची कन्या होती.

  10. याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले.

  11. त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाह राजाने मशुल्लामचा पुत्र, अजल्याहचा पुत्र व त्याचा चिटणीस शाफानला याहवेहच्या मंदिरात पाठवले. त्याने म्हटले:

  12. “मुख्य याजक हिल्कियाहकडे जा व याहवेहच्या मंदिरात आलेले पैसे, जे द्वारपालांनी गोळा केले होते ते याजकांनी तयार ठेवावे.

  13. त्यांनी ते मंदिरातील कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या पुरुषांकडे सोपवावे. आणि या लोकांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करणार्‍या कामगारांना द्यावे—

  14. सुतार, बांधकाम करणारे, गवंडी यांना द्यावा आणि मंदिराच्या डागडुजीसाठी लागणारी लाकडे व घडीव दगड विकत घेण्यात यावे.

  15. परंतु ज्यांच्याजवळ पैसा देण्यात आलेला आहे त्यांचा हिशोब ठेवण्याची गरज नव्हती, कारण ते विश्वासूपणे कार्य करीत आहेत.”

  16. मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले.

  17. मग शाफान चिटणीस राजाकडे गेला आणि त्याला अहवाल दिला: “तुझ्या सेवकांना जे पैसे याहवेहच्या मंदिरासाठी मिळाले, त्यांनी ते मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्‍यांच्या हाती दिले आहेत.”

  18. मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले.

  19. जेव्हा राजाने नियमशास्त्रातील वचने ऐकली, तेव्हा त्याने दुःखाने आपली वस्त्रे फाडली.

  20. त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:

  21. “जा आणि माझ्यासाठी आणि लोकांसाठी आणि सर्व यहूदीयासाठी, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर पेटला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”

  22. याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.

  23. दावीदाचा चुलता योनाथान हा सुशिक्षित असून उत्तम सल्लागार व लेखनिक होता. हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांचा शिक्षक होता.

  24. नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्‍यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली.

  25. तेव्हा ताबडतोब राजाच्या चिटणीसांना बोलाविण्यात आले—तो तिसऱ्या, म्हणजे सिवान महिन्याचा, तेविसावा दिवस होता. त्यांनी मर्दखयाने भारतापासून कूशपर्यंतच्या 127 प्रांतातील यहूद्यांना, प्रांतप्रमुखांना, राज्यपालांना, व प्रतिष्ठितांना पाठविण्यासाठी फर्मान लिहून घेतले. राज्यातील विविध लोकांच्या विविध भाषांमधून व लिप्यांमधून, तसेच यहूद्यास त्यांच्या भाषेत व लिपीत ते फर्मान लिहिण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्र लिहून, ते बंद करून त्यावर राजाच्या मुद्रेची मोहोर लावली. मग ती पत्रे राजाच्या निरोपासाठी वापरले जाणारे खास वाढविलेले वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठविली.