मुख्य मजकुरावर जा

Rome बद्दल बायबलमधील वचने: Christians in:

22 वचने · 5 पैलू

Christians in: बद्दल वचने

  1. त्यांच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा. माझा प्रिय मित्र अपैनत यालाही सदिच्छा, आशियामध्ये त्यानेच प्रथम ख्रिस्ताचा स्वीकार केला.

  2. जिने तुम्हासाठी खूप परिश्रम केले त्या मरीयेलाही सदिच्छा सांगा.

  3. माझे यहूदी बंधू अंद्रोनीक व युनिया, जे माझ्याबरोबर तुरुंगात होते त्यांना पण सदिच्छा द्या. प्रेषितांमध्ये त्यांचे स्थान अवर्णनीय आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तात होते.

  4. प्रभूमध्ये प्रिय मित्र आंप्लियात याला माझ्या सदिच्छा कळवा.

  5. तसेच ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सदिच्छा कळवा.

  6. अपिल्लेस जो ख्रिस्ताशी एकनिष्ठ असून परीक्षेस उतरलेला आहे त्याला सदिच्छा कळवा. तसेच अरिस्थबूलच्या घरातील सर्वांना माझ्या सदिच्छा कळवा.

  7. माझा नातेवाईक हेरोदियोन याला सदिच्छा द्या. नार्सिसाच्या घरातील जे प्रभूमध्ये आहेत त्यांना सदिच्छा कळवा.

  8. त्रेफैना आणि त्रेफोसा, या स्त्रियांनी प्रभूमध्ये खूप श्रम केले, त्यांना सदिच्छा कळवा. प्रिय मैत्रीण पर्सिस, हिला सदिच्छा कळवा. तिने प्रभूमध्ये अतिशय कष्ट घेतले.

  9. प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा.

  10. असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रोबास, हेर्मेस यांना व त्यांच्याबरोबर असणार्‍या सर्व बंधू व भगिनींना सदिच्छा कळवा.

  11. फिललग, युलिया, नीरिय व त्याची बहीण, ओलुंपास, व त्यांच्या बरोबरच्या सर्व पवित्र जणांना सदिच्छा कळवा.

  12. एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सदिच्छा कळवितात.

  13. आता बंधूंनो व भगिनींनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की, जे शिक्षण तुम्हाला मिळाले आहे त्याविरुद्ध जे फूटी व अडथळे आणणारे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा; आणि त्यांच्यापासून दूर राहा.

  14. आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.

  15. याचा परिणाम असा झाला की, राजवाड्यामध्ये असलेले पहारेकरी आणि प्रत्येकास हे स्पष्टपणे माहीत झाले आहे की मी ख्रिस्तासाठी बंधनात आहे.

  16. आणि माझ्या या बंधनामुळे, येथील बहुतेक बंधू व भगिनींना प्रभूमध्ये धैर्य प्राप्त झाले आहे आणि ते पहिल्यापेक्षा धैर्याने अधिक निर्भयपणे शुभवार्ता जाहीर करत आहेत.

  17. हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात.

  18. दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे.

  19. पण पूर्वीचे जे आहेत ते काहीजण ख्रिस्ताचा प्रचार स्वार्थी महत्त्वाकांक्षेने व अप्रामाणिकपणे करतात, यामुळे येथे मी बंधनात असताना ते माझ्या दुःखात भर घालतात.

  20. परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार. होय, त्यातच मी आनंद करीत राहीन.

  21. आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात.

  22. हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात.