Skip to content

Revelation बद्दल बायबलमधील वचने

22 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मोशे आपला सासरा, मिद्यानी याजक इथ्रो याची मेंढरे चारीत होता. तो ती मेंढरे घेऊन रानात, परमेश्वराचा डोंगर होरेबच्या मागच्या बाजूला गेला.

  2. तिथे त्याला एका झुडूपात अग्निज्वालेमधून याहवेहचा दूत प्रकट झाला. झुडूप तर पेटले आहे, पण ते जळत नाही असे जेव्हा मोशेने पाहिले,

  3. तेव्हा मोशेने विचार केला “ते झुडूप का जळत नाही, हे विचित्र दृश्य मी त्याजवळ जाऊन बघेन.”

  4. मोशे ते झुडूप पाहण्यासाठी गेला हे याहवेहने पाहिले, तेव्हा परमेश्वराने त्याला झुडूपातून आवाज दिला, “मोशे, मोशे!” मोशे म्हणाला, “हा मी येथे आहे.”

  5. परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.”

  6. मग ते म्हणाले, “मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे, म्हणजे मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण परमेश्वराकडे पाहण्यास तो घाबरला.

  7. परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.”

  8. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”

  9. परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे.

  10. मी सर्वसमर्थ परमेश्वर म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रकट झालो होतो, परंतु माझ्या याहवेह या नावाने मी स्वतःची त्यांना ओळख करून दिली नव्हती.

  11. नंतर दावीदाने मंदिराची नियोजित जागा, तेथील भवने, भांडारगृहे, वरच्या खोल्या, आतील खोल्या, तसेच प्रायश्चिताची जागा यांचा नकाशा शलोमोनाला दिला.

  12. पवित्र आत्म्याने ज्या योजना त्याच्या मनात घातल्या होत्या त्या याहवेहच्या मंदिराच्या अंगणाचा, सभोवतालच्या खोल्यांचा, परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यांचा व समर्पित वस्तूंच्या कोठारांचाही नकाशा त्याला दिला.

  13. याजक व लेवी यांच्या विभागांच्या कामकाजाच्या सूचनाही राजाने शलोमोनाला दिल्या, त्याचप्रमाणे याहवेहच्या मंदिरातील भक्ती व सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा तपशीलही त्याने त्याला दिला.

  14. त्याने वजन करून निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या सोन्याच्या पात्रांसाठी लागणारे पुरेसे सोने व निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी लागणारी पुरेशी चांदी दिली.

  15. दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली.

  16. त्याने समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी व इतर सोन्याच्या मेजांसाठी सोने तोलून दिले. त्याने चांदीच्या मेजांसाठीसुध्दा चांदी तोलून दिली.

  17. शुद्ध सोन्याचे काटेरी चमचे, शिंपडण्यासाठी लागणारे कटोरे आणि प्याले; सोन्याच्या प्रत्येक ताटासाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक ताटासाठी चांदी तोलून दिली;

  18. आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्‍या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला.

  19. दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.”

  20. आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”

  21. येशूंनी उत्तर दिले, “योनाहच्या पुत्रा शिमोना, तू धन्य आहेस, हे तुला मांस किंवा रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे

  22. पण तो हे बोलत असतानाच, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!”