Skip to content

Oppression बद्दल बायबलमधील वचने

86 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे.

  2. “परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.

  3. “विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.

  4. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.

  5. मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.

  6. एखादा गुलाम आपल्या धन्यापासून पळून तुमच्याकडे आला असेल, तर तुम्ही त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नका.

  7. त्यांना जे गाव आवडेल, त्या गावात तुमच्यामध्ये त्यांना राहू द्यावे. तुम्ही त्यांना छळू नये.

  8. गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.

  9. त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्‍हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  10. तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला.

  11. याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले.

  12. तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.”

  13. “दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे, कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो:

  14. त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार; त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही.

  15. आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील, आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत.

  16. दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो,

  17. जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील, आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील.

  18. त्याने बांधलेले घर पतंगाच्‍या कोशाप्रमाणे आहे, पहारेकर्‍याच्या झोपडीप्रमाणे ते आहे.

  19. धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो; पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते.

  20. संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.

  21. पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो; त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो.

  22. तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो तरी त्याच्यावर दया न होता तो दूर फेकला जाईल.

  23. टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल.”

  24. याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.

  25. याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा.