Skip to content

Oppression बद्दल बायबलमधील वचने

86 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  2. “नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी मोशेच्या सिंहासनावर बसतात.

  3. त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा, पण ते जसे करतात तसे आचरण करू नका, कारण ते सांगतात त्याप्रमाणे करीत नाहीत.

  4. ते जड, अवघड ओझी बांधतात व इतर लोकांच्या खांद्यावर लादतात, परंतु ती हालविण्यास स्वतःचे बोटही लावण्याची त्यांची इच्छा नसते.

  5. परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’

  6. परंतु तुम्ही गरिबांचा अपमान केला आहे. धनवान लोकच तुमचे शोषण करतात की नाही? तेच लोक तुम्हाला न्यायालयात खेचतात की नाही?

  7. पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.

  8. आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे.

  9. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.

  10. अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.

  11. तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात आणि ज्यागोष्टी त्यांना उपजत स्वभावाने समजतात—जसे अविवेकी प्राणी करतात—त्यायोगे ते नाश करून घेतील.