Skip to content

Oppression बद्दल बायबलमधील वचने: National, relieved

8 वचने · 8 पैलू

National, relieved बद्दल वचने

  1. आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे.

  2. तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला.

  3. याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले.

  4. कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “प्रथम माझे लोक इजिप्त देशात राहवयास गेले; नंतर अश्शूरच्या लोकांनी त्यांचा छळ केला.”

  5. आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे.

  6. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.

  7. अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.

  8. तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात आणि ज्यागोष्टी त्यांना उपजत स्वभावाने समजतात—जसे अविवेकी प्राणी करतात—त्यायोगे ते नाश करून घेतील.