Oppression बद्दल बायबलमधील वचने: God's aid promised against
God's aid promised against बद्दल वचने
याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत. म्हणून मी आता उठेन आणि त्यांची निंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”
तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो आणि गरजूंच्या मुलांना वाचवो; तो जुलमीला चिरडून टाको.
तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल, कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.
परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.