Skip to content

Mountain बद्दल बायबलमधील वचने

58 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले;

  2. तिथे त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले, त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्यांची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.

  3. त्याचवेळी मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.

  4. तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभूजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”

  5. पण तो हे बोलत असतानाच, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!”

  6. ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले.

  7. पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!”

  8. जेव्हा त्यांनी वर पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांना कोणीही दिसले नाही.

  9. ते डोंगरावरून खाली उतरत असताना येशूंनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जे काही पाहिले, ते मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”

  10. येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे,” मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू इथून पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही.

  11. मग येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, तुम्ही संशय न धरता विश्वास ठेवाल, तर जे काही अंजिराच्या झाडाबाबत झाले ते तुम्ही सुद्धा कराल, या डोंगराला ‘ऊठ आणि समुद्रात पड,’ असे तुम्ही म्हणालात, तर ही गोष्ट केली जाईल.

  12. यानंतर येशूंचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूंनी त्यांना जमावयास सांगितले होते, त्या डोंगरावर गेले.

  13. त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांची उपासना केली. परंतु काहींनी संशय धरला.

  14. सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले, तिथे ते एकटे असताना त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले.

  15. त्यांची वस्त्रे इतकी शुभ्र, चमकणारी झाली की जगामध्ये इतर कोणालाही त्यापेक्षा शुभ्र करता येणार नाही.

  16. तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले.

  17. तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण या ठिकाणी तीन मंडप उभारू या—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”

  18. त्याला काय बोलावे हे समजत नव्हते, कारण ते भयभीत झाले होते.

  19. इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!”

  20. मग एकाएकी, जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांच्या नजरेस कोणीही पडले नाही.

  21. ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.

  22. म्हणून त्यांनी ही गोष्ट आपसातच ठेवली आणि, “मरणातून पुन्हा उठणे” म्हणजे काय या गोष्टीविषयी ते चर्चा करू लागले.

  23. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल.

  24. त्या दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू डोंगरावर गेले आणि त्यांनी तिथे रात्रभर परमेश्वराची प्रार्थना केली.

  25. या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना येशूंनी बरोबर घेतले आणि ते प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले.